भारताची विजयी सलामी! पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय

भारताची विजयी सलामी! पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय

IND vs IRE : टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात (IND vs IRE) केली आहे. पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय (T20 World Cup 2024) मिळवला. बुधवारी झालेल्या या सामन्यात आयर्लंडने 96 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने आठ गडी राखून हा सामना सहज जिंकला. हा न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात आला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली त्यामुळे आयर्लंडचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि जसप्रित बुमराह यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आयर्लंडला 96 धावांत गुंडाळता आले. यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले.

T20 World Cup : टी 20 विश्वचषकात युवा खेळाडूंचा भरणा; ‘या’ मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आयर्लंडला अवघ्या 96 धावांत ऑल आऊट केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली आणि संघाला सावरता आले नाही.

सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने 5 धावा केल्या आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगने 2 धावा केल्या. जॉर्ज डॉकरेल (3) , मार्क एडेअर (3) , जॉर्ज डॉकरेल (3) तर कर्टिस कॅम्फरने 12 आणि लॉर्कन टकरने 10 धावांचे योगदान दिले. बॅरी मॅकार्थीचे खाते उघडलेले नाही. तर आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 चेंडूत 26 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

आयर्लंडवरील विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर पुढील सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ फक्त एकदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला आहे. बाकीच्या सर्व सामन्यात टीम इंडियाच्या शिलेदारांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. अनेक सामन्यात तर भारतीय संघाने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. आता 9 जून रोजी होणाऱ्या सामन्यातही पाकिस्तानला जोरदार झटका देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानवर विजय मिळवून विजयी घोडदौड भारत कायम राखणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज