“पीओके आमचे नाही, ते विदेशी क्षेत्र”; पाकिस्तानचा खोटेपणा उघड, कोर्टात नेमकं काय घडलं?

“पीओके आमचे नाही, ते विदेशी क्षेत्र”; पाकिस्तानचा खोटेपणा उघड, कोर्टात नेमकं काय घडलं?

Pakistan News : पाकव्याप्त काश्मीरवर कायमच आपला दावा सांगणाऱ्या पाकिस्ताननेच आता कबूल केले आहे पीओके त्यांचा भाग नाही. पाकिस्तानच्या राजधानीच्या शहरातील उच्च न्यायालयात एक प्रकरणात सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलीने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तान आझाद काश्मीर या नावाने संबोधतो.

उच्च न्यायालयात अपहरण झालेल्या कवी अहमद फराद यांच्याशी संबंधित प्रकरणात सुनावण सुरू होती. या दरम्यान पाकिस्तान सरकारच्या वकिलांनी सांगितले की कवी फराद यावेळी स्वतंत्र काश्मीरमध्ये 2 जूनपर्यंत रिमांडवर आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात आणता येणार नाही. कारण सध्या ते विदेशी क्षेत्रात आहेत. सरकारी वकिलाच्या या दाव्यावर न्यायाधीशही हैराण झाले. जर स्वतंत्र काश्मीर विदेशी क्षेत्र आहे तर मग पाकिस्तानी रेंजर्स तिथे कसे काय पोहोचेले असा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणात सुनावणी सुरू राहणार आहे.

ICC Rankings : टीम इंडियाच अव्वल! विंडीजचाही मोठा उलटफेर; पाकिस्तान टॉप 5 मध्येही नाही

पाकव्याप्त काश्मिरात सध्या पाकिस्तान विरोधाचा आगडोंब उसळला आहे. येथील नागरिक पाकिस्तान सरकावर प्रचंड चिडले आहेत. मागील आठवड्यात येथे लोकांनी सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात हिंसाचारही पाहण्यास मिळाला होता. त्यातच याच भागातील लोकप्रिय कवी अहमद फराद दोन आठवड्यांपासून गायब झाले आहेत. येथील आंदोलकांना असा संशय आहे की त्यांना पाकिस्तान पोलिसांनी तुरुंगात डांबले आहे. तर काहींच्या मते ते भूमिगत झाले असावेत.

याच प्रकरणात इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान सरकारच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की अहमद फराद यांना अटक केलेली नाही. त्यांना पाकिस्तान सरकार अटक करू शकत नाही. कारण पीओके आपला भूभाग नाही दुसऱ्या देशाचा आहे. सरकारी वकिलांच्या या युक्तिवादार न्यायालय हैराण झाले. जर पीओके दुसऱ्या देशाचा भाग असेल तर मग पाकिस्तानी रेंजर्स तिथे काय करत आहेत असा सवाल न्यायालयाने विचारला.

Pakistan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा; दोन्ही देशांत नक्की काय शिजतंय?

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी सातत्याने (Pakistan PM Shahbaz Sharif) वाढत चालल्या आहेत. देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारही हैराण झाले आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे सरकारी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच पाकव्याप्त काश्मिरात आंदोलन सुरू झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज