Amit Shah : ‘नेहरूंच्या चुकीमुळचे ‘POK’ चा वाद’; अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amit Shah : ‘नेहरूंच्या चुकीमुळचे ‘POK’ चा वाद’; अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amit Shah : केंद्र सरकारने जम्मू काश्मिर राज्यातील 370 कलम हटवल्याच्या घटनेला (Jammu Kashmir) आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत पुन्हा एकदा या मुद्द्यावर चर्चा केली. संसदेतील भाषणात त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. जम्मू काश्मिरातून कलम 370 हटवलं हे अजूनही अनेक जणांना खटकत आहे. मागील सत्तर वर्षांच्या काळात ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांना अपमान सहन करावा लागला आणि ज्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आलं त्यांना न्याय देण्यासाठी जम्मू काश्मीर आरक्षण संशोधन अधिनियम 2023 आणि जम्मू काश्मीर पुनर्गठण संशोधन विधेयक आहे. काश्मीरातील 45 हजार लोकांच्या मृत्यूसाठी हेच कलम 370 जबाबदार होते. ज्याला मोदी सरकारने उखडून फेकून दिले.

अमित शहा यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. पाकव्याप्त काश्मीरची (POK) समस्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच उत्पन्न झाली होती. सगळा काश्मीर भारताच्या हातात येण्याआधीच युद्धविरामाची घोषणा केली गेली. जर ही घोषणा केली गेली नसती तर आज पीओके सुद्धा भारताचाच हिस्सा राहिला असता. शाह यांच्या या वक्तव्यानंतर संसदेत विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. त्यानंतर लोकसभेतून वॉकआउट केले.

शहा पुढे म्हणाले, विधेयकाच्या नावाबरोबरच सन्मानही जोडला गेला आहे. हे फक्त तेच लोक पाहू शकतात जे मागे राहिलेल्या लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. जे लोक फक्त मतपेटीचं राजकारण करतात त्यांना ही गोष्ट कधीच लक्षाते येणार नाही, असा टोला गृहमंत्री शहा यांनी काँग्रेसला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नेता आहेत. ज्यांनी गरीबाच्या घरात जन्म घेतला आणि आज देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे मागास आणि गरीब लोकांचं दुःख ते चांगल्याप्रकारे जाणतात. जम्मू काश्मिरातून 370 हटवणं हे अनेक लोकांना खटकत आहे.

370 कलम हटवलं तर काश्मिरात रक्ताचे पाट वाहतील असे म्हटले जाते होते. पण, रक्ताचे पाट तर सोडाच साधा दगड मारण्याचीही हिंमत कुणी करू शकला नाही. देशाचा एकच झेंडा आणि निशाणी असली पाहिजे. कलम 370 आधीच हटवायला हवे होते, असेही शहा म्हणाले.

अधीर चौधरींचं चॅलेंज शहांनी स्वीकारलं

लोकसभेत चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी इशारा देत म्हटले की एक दिवस निश्चित करा आणि पंडीत नेहरूंनी काश्मीर प्रकरणात काय योगदान दिले याची चर्चा करा. भाजप नेत्यांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की काश्मीर प्रश्न नेहरुंनी व्यवस्थित हाताळला नाही. यावर शहा यांनी उत्तर देत सरकार हे आव्हान स्वीकारत आहे आणि चर्चेलाही तयार असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा : एनडीएला बिहारमध्ये मिळाला नवा भिडू; अमित शहा यांच्या भेटीनंतर निर्णय

कॉंग्रेसवाले फक्त मीडियाशी बोलतात, अमित शहा यांची टीका

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube