Amit Shah in Pune: मोदींनंतर अमित शाह यांचाही पुणे दौरा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही असणार उपस्थित

Amit Shah in Pune: मोदींनंतर अमित शाह यांचाही पुणे दौरा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही असणार उपस्थित

Amit Shah in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. तसेच त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आहे येत्या रविवारी (ता.6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. ( Home minister Amit Shah in Pune after PM Modi Pune Visit )

Ahmednagar BJP : बाहेरून आलेल्यांच्या पालख्या उचलणार नाही… शहराचा आमदार भाजपाचाच व्हावा

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते यावेळी पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असणार आहेत. तर गुरूवारी नार्वेकर यांनी एका शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीत थेट अजित पवार यांनाच बसवलं. उपस्थितांमध्ये यामुळे दबक्या आवाजात अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली. त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एका मंचावर येणार आहेत.

धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवार साहेबांचा विरोधच पण..; आव्हाडांनी फोडलं मोठं गुपित!

यावेळी देशभरातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक देखील होणार आहे. सहकारी संस्थांना व्यवसायात सहजता यावी यासाठी केंद्र सरकारच्या सहकारी विभागामार्फत केंद्रीय सहकारी संस्थांच्या निबंधकानी तयार केलेल्या ‘सहकार से समृद्धी’ या पोर्टलचे उद्घाटन रविवारी दुपारी 12 वाजता शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य नेते तथा केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव विजय कुमार याबरोबरच देशभरातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube