Ahmednagar BJP : बाहेरून आलेल्यांच्या पालख्या उचलणार नाही… शहराचा आमदार भाजपाचाच व्हावा
Ahmednagar BJP : राज्यात आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच आता आगामी विधानसभा पाहता नगर शहरातील इच्छुकांसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान नुकतेच भाजपने नव्याने काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपच्या नगर शहराच्या अध्यक्षपदी अभय आगरकर यांची नियुक्ती झाली आहे. आगरकर यांच्या दांडग्या अनुभवामुळे भाजपाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहराचा आमदार भाजपाचाच झाला पाहिजे. बाहेरून आलेल्या इतरांच्या पालख्या आम्ही उचलणार नाही, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले. (Ahmednagar BJP Aggressive on who came from another party )
Ahmednagar News : अहमदनगरला येताय तर जाणून घ्या वाहतुक मार्गातील बदल…
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने भाजपाच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची निवड झाल्याबद्दल, तसेच जैन ओसवाल पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष गांधी व व्हाईस चेअरमनपदी समीर बोरा यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचा एकत्रित सत्कार करण्यात आला. यावेळी दीनदयाळ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, सचिव विकास पाथरकर, संचालक निलेश लोढा व बाबासाहेब साठे आदींसह पतसंस्थेचे सभासद व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
इम्रान खानला दणका! समर्थक 120 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; कारणही आले समोर
दरम्यान यावेळी बोलताना अभय आगरकर म्हणाले, भाजपाने माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त करत दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल. तसेच दीनदयाळ पतसंस्थेचे सर्वांनी मिळून लावलेले छोटे रोपटे आता मोठे वटव्रुक्ष झाले आहे. पतसंस्थेचे काम उत्कृष्टपणे चालू असल्याने संस्थेची प्रतिमा उजळलेली आहे. सर्वसामान्यांना आधार असलेल्या या पतसंस्थेचे रुपांतर बँकेत व्हावे.
दिलीप भालसिंग म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा व जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचे पूर्वीपासून मला मार्गदर्शन होत आहे. पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मला दिली आहे. सर्वांना बरोबर घेत ही जबाबदारी निभावणार आहे.