पुतिनविरोधात बंड करणारे येवेजनी प्रिगोझिन विमान अपघातात ठार
Wagner Group chief Yevgeny Prigozhin Dead : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) ठार झाले आहेत. प्रिगोझिन हे प्रवास करत असलेले विमान कोसळून अपघात झाला आहे. यात प्रिगोझिनसह विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त
जगभरातील माध्यम संस्थांनी दिले आहे.
Chandrayaan-3 च्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पाकिस्ताननेही केलंही भारताचं अभिनंदन
युक्रेन व रशियात अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रिगोझिन नेतृत्वाखालील वॅग्रर लष्कराने पुतिन विरोधात बंड केले होते. हे बंडही पुतिन यांनी शांत केले होते. परंतु त्यानंतर प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. यावर आता जगभरातून संशय व्यक्त केला जात आहे.
Chandrayaan-3 ; दक्षिण ध्रुवावर लँडिंग, विक्रम आणि प्रज्ञान देणार सूर्यमालेची माहिती
बुधवारी मॉस्कोकडून पीटर्सबर्गकडे हे विमान जात होते. एका गावामध्ये हे विमान कोसळले आहे. त्यानंतर विमानाला आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या विमानातील तीन पायलटसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या यादीत खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन यांचे नाव मृत्यूच्या यादीत असल्याचे वृत्त आहे. या अपघाताची चौकशी सुरू असल्याची माहिती रशियातील वृत्तसंस्थांकडून देण्यात येत आहे.
जून महिन्यात ६२ वर्षाय प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने पुतिनविरोधात बंड केले होते. पुतिन यांना पदावर हटविण्याचे प्रयत्न सुरू होते. पण पुतिन हे बंड रोखण्यात यशस्वी झाले होते. दोघांमध्ये वाद मिटला होता. त्यानंतर प्रिगोझिन हे आपला देश सोडून बेलारुसमध्ये राहण्यासाठी गेले होते. परंतु अनेकदा ते रशियात येत होते. आता त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे.