पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा; नवख्या आयर्लंडची १७ वर्षांनंतर विजयाला गवसणी

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा; नवख्या आयर्लंडची १७ वर्षांनंतर विजयाला गवसणी

Ireland beat Pakistan in first T20 Match : पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच आयर्लंडच्या संघाने मोठा कारनामा केला. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला. याआधी दोन्ही संघात फक्त एकच सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. दरम्यान, टी 20  विश्वचषकाआधी ही (T20 World Cup 2024) मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिलाच सामना पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानी संघावर त्यांच्या देशातील माजी खेळाडूंकडून जोरदार टीका होत आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डबलिन येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 182 धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने 57 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने संघाला १८२ धावा करता आल्या. मात्र गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

ICC Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयकडून भूमिका स्पष्ट

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खराब राहिली. संघाच्या १४ धावा झालेल्या असतानाच कप्तान पॉल स्टर्लिंग बाद झाला. त्यानंतर पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर संघाला दुसरा धक्का बसला. लोर्कन टकर फक्त चार धावा करून तंबूत परतला. यानंतर अँड्रयू बालबर्नी आणि हॅरी टेक्टर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची मोठी भागीदारी केली.

यानंतर थेट तेराव्या ओव्हरमध्ये हॅरी टेक्टर ३६ धावांवर खेळत असताना बाद झाला. यानंतर जॉर्ज डॉकरेलच्या रुपात संघाला चौथा झटका बसला. डॉकरेलने २४ धावा केल्या. बालबर्नीने ७७ धावा केल्यानंतर तोही बाद झाला. यानंतर कर्टिस कॅम्फर आणि गॅरेथ डेलानी या दोघांनी शानदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर आयर्लंड संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी आघाडी घेतली आहे.

Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’, पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज