T20 World Cup : आयर्लंड, पापुआ न्यू गिनी संघांची घोषणा; टी 20 वर्ल्डकप तयारी अंतिम टप्प्यात

T20 World Cup : आयर्लंड, पापुआ न्यू गिनी संघांची घोषणा; टी 20 वर्ल्डकप तयारी अंतिम टप्प्यात

T20 World Cup 2024 Team Squad :  यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या (T20 World Cup) देशात होणार आहे. या स्पर्धांसाठी आयसीसीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. क्रिकेट संघाच्या घोषणा होत आहेत. आज आयर्लंड आणि पापुआ न्यू गिनी या दोन संघांच्या घोषणा झाल्या आहेत. या स्पर्धेसाठी वीस संघ पात्र ठरले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंधरा सदस्यीय संघाची घोषणा करण्यासाठी येत्या २५ मे पर्यंत मुदत आहे.

न्यूझीलँडन 29 एप्रिल रोजी संघाची घोषणा केली होती. या वर्ल्डकपमध्ये घोषित होणारा हा पहिलाच संघ ठरला होता. न्यूझीलँडने संघाच्या घोषणेबरोबरच नवीन प्लेइंग किटही लाँच केली होती. यानंतर आता टीम इंडियानेही किट लाँच केली आहे. या स्पर्धेसाठी भारतासह इंग्लंड, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका संघांची घोषणी झाली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामना ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जर्सी लाँच; खेळाडू दिसणार नव्या रंगात

दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) मागील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली. T20 World Cup 2024 साठी बीसीसीआयने 15 खेळाडूंची निवड केली. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली. रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, सिराज, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्डकप वेळापत्रक

5 जून – भारत विरुद्ध आयर्लंड

9 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान

12 जून – भारत विरुद्ध यूएसए

15 जून – भारत विरुद्ध कॅनडा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज