Team India : जिंकल्याचा फायदा नाहीच! टीम इंडियाचा दुसरा नंबर कायम; नेमकं काय घडलं?

Team India : जिंकल्याचा फायदा नाहीच! टीम इंडियाचा दुसरा नंबर कायम; नेमकं काय घडलं?

Team India in WTC Points Table : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी (IND vs ENG) सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत (Team India) मालिकाही जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. या यादीत न्यूझीलंड (New Zeland) प्रथम क्रमांकावर आहे. न्यूझीलंड संघाची विजयाची सरासरी 75 टक्के आहे. तर आता चौथ्या कसोटीतील विजयानंतर भारताची टक्केवारी 59.52 टक्क्यांवरून 64.58 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पराभूत झालेल्या इंग्लंडच्या (England) विजयाची सरासरी 21.88 टक्क्यांवरून 21 पर्यंत खाली आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिला आहे. बांग्लादेश चार, पाकिस्तान पाच, वेस्ट इंडिज सहा, दक्षिण आफ्रिका सात, इंग्लंड आठ आणि श्रीलंकेचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. चौथ्या कसोटीसह मालिकेत विजय झाल्यानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला त्याचा काही फायदा झाला नाही.

IND vs ENG : इंग्लंडला नमवलं! गिल-जुरेलच्या खेळीने टीम इंडियाने 17 वी मालिका जिंकली

टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली.

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या 353 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. पण ध्रुव जुरेलने एकट्याने किल्ला लढवला. ध्रुवने ९५ धावांची खेळी खेळली. ध्रुवच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. ध्रुवच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडिया ३०० चा टप्पा पार करू शकली. टीम इंडियाचा डाव ३०७ धावांवर संपला आणि इंग्ल्डच्या टीमला ४६धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १४५ धावा करून टीम इंडियासमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. ते टीम इंडियाने ६१ षटकांत ५ विकेट्स गमावून पार केले.

IND vs ENG Test : यशस्वी, रोहित नंतर रजतसह भारताचा तिसरा बळी, टीम इंडियाला विजयासाठी 92 धावांची गरज

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube