विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानचा न्युझीलंडला धक्का; एकतर्फी सामना जिंकला

विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानचा न्युझीलंडला धक्का; एकतर्फी सामना जिंकला

T20 World Cup : टी वर्ल्डकपमध्ये सध्या मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. काल अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये बलाढ्य पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आणखी एक उलटफेर पाहण्यास मिळाला. अफगाणिस्तानच्या संघाने चिवट खेळ करत न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात अफगाणिस्तानने 84 धावांनी न्युझीलंडचा पराभव केला. या पराभवामुळे विश्वचषकातील न्यूझीलंड संघाची वाटचाल आणखी कठीण झाली आहे. अफगाणिस्तानने मात्र आपला रस्ता अधिक सोपा केला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली त्यामुळे किवी संघाला फक्त 75 धावांत ऑल आऊट करून सामना खिशात टाकला.

T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय

सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हर्समध्ये 159 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी हे आव्हान फार कठीण नव्हते. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी हे आव्हान कठीण बनवले. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने 80 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानला 160 धावांचे लक्ष्य देता आले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब राहिली. पहिल्याच चेंडूवर संघाला पहिला धक्का बसला. फजलहक फारुकीने फिन अॅलनला त्रिफळाचित केले. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा धक्का बसला. यानंतर न्यूझीलंडचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळे फक्त 75 धावांवर संघ ऑल आऊट झाला. न्यूझीलंडच्या फलंदाजांना संपूर्ण वीस ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलीप्सने 18 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त अन्य फलंदाज काहीही करू शकले नाहीत. केन विल्यमसनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाचा हा विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवानंतर न्यूझीलंड संघाची वाटचाल कठीण झाली आहे. त्यांना पुढील सामने जिंकावेच लागणार आहेत. अन्यथा त्यांना पुढील फेरीत प्रवेश करता येणार नाही.

टी 20 विश्वचषकाचं रिपोर्ट कार्ड; ‘या’ संघांवर भारी टीम इंडियाचे ‘वाघ’ 

दरम्यान, याआधी अमेरिकेनेही थरारक सामन्यात बलाढ्य पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात सुपर ओव्हर घ्यावी लागली. या सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्याचा फटका पाकिस्तानला बसला. याआधी नामिबिया आणि ओमान सामन्यात सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना २२ धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरूवात खराब झाली. पुन्हा एकदा नामिबियाकडून अनुभवी खेळाडू वीजा गोलंदाजीसाठी आला. भेदक गोलंदाजी करत नामिबियाला पहिल्या तीन चेंडूतच विजय निश्चित केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज