World Cup 2023 : मार्श-स्मिथची तुफान खेळी! ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर मोठ्ठा विजय

World Cup 2023 : मार्श-स्मिथची तुफान खेळी! ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर मोठ्ठा विजय

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा आठ विकेट्सने दणदणीत पराभव केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने आठ विकेट गमावत 306 धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 45 व्या ओव्हरमध्येच सामना खिशात टाकला. या सामन्यात मिचेल मार्शने (Mitchell Marsh) शानदार शतक केले. ऑस्ट्रेलियाचा हा सलग सातवा विजय आहे. तर या स्पर्धेतील बांग्लादेश (Bangladesh) संघाचा हा सातवा पराभव आहे. या विजयानंतरही गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावरच राहिला आहे. आता सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर सामना होईल.

World Cup 2023 : पाकिस्तानची टीम बॅगा भरुन तयार; चमत्कारच देऊ शकतो सेमीफायनलचे तिकीट

या सामन्यात मिचेल मार्शने तुफान शतक झळकावले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्शने 87 चेंडूत शतक केले. यानंतर त्याने वेगाने धावा केल्या. त्याने या सामन्यात एकूण 177 धावा केल्या. याआधी मागील सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनेही अशीच तुफानी खेळी केली होती. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नरने चांगली सुरुवात केली. मात्र त्याचा दुसरा साथीदार हेज फक्त दहा धावा करून बाद झाला. वॉर्नरने मात्र 53 धावा केल्या. यानंतर मिचेल मार्श मैदानात आला. त्याने स्मिथच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. स्मिथनेही या सामन्यात 67 धावा केल्या.

बांग्लादेशचे सलामीचे फलंदाज लिटन दास आणि तंजिद यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर तंजिद आऊट झाला. बांग्लादेशने 15 ओव्हर्समध्येच 100 धावा पूर्ण केल्या होत्या. अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर लिटन दास बाद झाला. यानंतर ठराविक अंतरावर बांग्लादेशच्या विकेट पडत गेल्या. संघाने ऑस्ट्रे्लियाला 306 धावांचे आव्हान दिले.

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार!

यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड

विश्वचषकामध्ये आता पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत चौथ्या नंबरवर असलेल्या भारतीय संघाचा न्यूझीलंडसोबत सेमी फायनल सामना होणार आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषकामध्येदेखील भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता.

विश्वचषकातील 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंकेमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत. या विजयामुळे आता न्यूझीलंडचे 10 गुण झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube