World Cup 2023 : पाकिस्तानची टीम बॅगा भरुन तयार; चमत्कारच देऊ शकतो सेमीफायनलचे तिकीट
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आता सेमी फायनलच्या सामन्यांना (World Cup 2023) सुरुवात होत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी सेमी फायनलचे तिकीट आधीच पक्के केले आहे. आता चौथ्या जागेसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या तीन संघात स्पर्धा होते. याचेही चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. कालच्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करत सेमी फायनलमधील एन्ट्री जवळपास पक्की केली आहे. न्यूझीलँडच्या विजयचा सर्वात मोठा धक्का पाकिस्तानला (Pakistan) बसला आहे. यानंतर आता पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग जवळपास बंदच झाला आहे.
World Cup 2023 : मॅक्सवेल तिसरा ! ‘या’ दोन फलंदाजांचं रेकॉर्ड तुटलंच नाही
श्रीलंकेवरील विजयामुळे न्यूझीलंड गुणतालिकेत पुढे गेला आहे. रनरेटच्या बाबतीतही न्यूझीलंड दोन्ही संघांच्या पुढे आहे. साखळी फेरीत पाकिस्तानचा शेवटचा सामना उद्या इंग्लँड विरुद्ध होणार आहे. हा सामना कोलकाता येथे होईल. सध्या न्यूझीलंडचा रनरे 0.74 आहे. हा रनरेट मागे टाकून पुढे जाण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्याला 287 किंवा 288 धावांनी विजय मिळवणे गरजेचे राहणार आहे. तसेच जर प्रथम गोलंदाजी घेतली तर इंग्लंडने दिलेले आव्हान किमान 284 चेंडू शिल्लक ठेऊन साध्य करावे लागणार आहे. जे केवळ अशक्यच आहे. कारण कमी धावसंख्येत ऑल आऊट होईल इतका कमकुवत इंग्लंडचा संघ नाही.
पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करून 400 धावा करण्याची आणि इंग्लँडला 112 धावांत रोखण्याची कामगिरी करावी लागेल. तरच पाकिस्तानचा रनरेट न्यूझीलँडच्या पुढे जाईल. सेमी फायनलमध्ये पोहोचणाऱ्या चौथ्या क्रमांकावरील संघाचा सामना भारताबरोबर मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे होईल. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता राहणार हे उद्याच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल.
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव
श्रीलंका सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर
बांग्लादेश, इंग्लंडनंतर आता श्रीलंकाही वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने सेमीफायनलचे तिकीट मिळविले आहे. आता पाच संघ सेमीफायनलच्या दोन जागांसाठी लढणार आहे. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाची दावेदारी पक्की झाली आहे. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान संघ शर्यतीत आहेत. परंतु जर-तर परिस्थितीवर या संघाचे नशीब आहे. त्यातही काल न्यूझीलँडने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे.