Rohit Sharma : हिटमॅन रोहित, रेकॉर्ड्समध्येही अव्वल; क्रिकेटमधील 5 खास कामगिरी..

Rohit Sharma : हिटमॅन रोहित, रेकॉर्ड्समध्येही अव्वल; क्रिकेटमधील 5 खास कामगिरी..

Rohit Sharma Birthday : टीम इंडियाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आता (Rohit Sharma Birthday) 37 वर्षांचा झाला आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा त्याच्याच खांद्यावर आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Team India) चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्याही नावावर अनेक विक्रम आहेत. रोहित शर्मा सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई संघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. रोहितने त्याचा कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. आता काहीच दिवसांत टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतही रोहित शर्माची बॅट तळपताना दिसेल.

वनडेत तीनदा द्विशतक

रोहित शर्मा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक केले आहेत. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक आणि श्रीलंकेविरुद्ध दोन द्विशत केले आहेत.

टी20 मध्ये षटकारांचा विक्रम

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याच्यानंतर न्यूझीलँडचा फलंदाज मार्टिन गप्टील याचा नंबर आहे. मार्टिन गप्टीलने आतापर्यंत 173 षटकार खेचले आहेत. आगामी विश्वचषक स्पर्धेत षटकारांचा विक्रम 200 च्या पुढे घेऊन जाण्याचा रोहित शर्मचा प्रयत्न राहिल असे म्हणण्यास हरकत नाही.

T20 World Cup : टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? हार्दिकला धक्का, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

मालिकेत सर्वाधिक शतक

रोहित शर्माने 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये पाच शतक झळकावले होते. या स्पर्धेत त्याने एकूण 9 सामन्यांत 648 रन केले होते. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 98.33 असा राहिला होता. या विश्वचषकात रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. यानंतरच्या अनेक क्रिकेट स्पर्धात भारतीय संघाची कप्तानी त्याच्याच खांद्यावर होती. यातील अनेक सामन्यांत त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

सर्वाधिक वैयक्तिक धावा

रोहितने वनडे प्रकारात सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर केला आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये कोलकाता शहरातील ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने 264 धावांची खेळी केली होती. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माचे हे दुसरे द्विशतक होते. या सामन्यात रोहितने शानदार फलंदाजी केली होती.

T20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

पाच वेळा मुंबईला बनवलं चॅम्पियन

भारतात सध्या टी 20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत रोहित मुंबईच्या संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. या स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकली तर असे लक्षात येते की रोहितने त्याच्या कप्तानीत सर्वाधिक पाच वेळी विजेतेपद पटकावले. 2013,2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने विजेतेपद पटकावले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज