विंडीजचा कहर! अमेरिकेवर दणदणीत विजय; होपसमोर गोलंदाजांची शरणागती

विंडीजचा कहर! अमेरिकेवर दणदणीत विजय; होपसमोर गोलंदाजांची शरणागती

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत (T20 World Cup 2024) दमदार कामगिरी करणाऱ्या अमेरिकेला सुपर 8 फेरीत (WI vs USA) मात्र उतरती कळा लागली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजनं धुतलं. या सामन्यात वेस्टइंडिजने (West Indies) अमेरिकेचा दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 129 धावा केल्या. प्रत्यु्त्तरात विंडीजच्या शाई होपने (Shai Hope) तडाखेबंद फलंदाजी करत अवघ्या 10.5 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. होपने 39 चेंडूत 82 धावा चोपल्या. निकोलस पूरननेही चांगली फलंदाजी केली. याआधी गोलंदाजीतही विंडीजने कमाल केली. रोस्टन चेज आणि आंद्रे रसेल यांनी धारदार गोलंदाजी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएसएने 19.5 ओव्हर्समध्ये 128 धावा केल्या होत्या. अँड्रीज गाऊसने सर्वाधिक 29 धावा केल्या. नीतीश कुमारने 19 चेंडूत 20 धावा केल्या. कर्णधार अॅरोन जोन्सने 11 धावा केल्या. गोलंदाजीत वेस्टइंडिजच्या आंद्रे रसेलने तीन विकेट घेतल्या. अल्जारी जोसेफने 4 ओव्हरमध्ये 31 रन देत 2 विकेट घेतल्या. रोस्टन चेजने 4 ओव्हरमध्ये 19 रन देत तीन विकेट घेत यूएसएच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

इंग्लंडने रोखला विंडीजचा विजयरथ; सुपर 8 मधील सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय

यूएसएने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडिजने फक्त 10.5 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. होप आणि ज़ॉन्सन चार्ल्स या दोघांनी विंडीजच्या डावाची सुरुवात केली. चार्ल्स 15 धावा करून बाद झाला. त्याला हरमीत सिंहने बाद केले. दुसऱ्या बाजूला होपने मात्र धुवाधार फलंदाजी सुरुच ठेवली होती. त्याने 39 चेंडूत 82 धावा केल्या. निकोलस पूरनने 27 धावा केल्या.

दरम्यान, सुपर 8 फेरीत ग्रुप 2 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर दिसते की सध्या दक्षिण आफ्रिका टॉपवर आहे. आफ्रिकेचे चार गुण आहेत. वेस्टइंडिजचे दोन गुण आहेत. वेस्टइंडिज दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचेही दोन गुण आहेत. परंतु, इंग्लंडपेक्षा विंडींजचा रनरेट चांगला आह. यामुळे विंडीज इंग्लंडच्या पुढे आहे.

गोलंदाजी अन् फिल्डींगमध्येही अव्वल; थरारक सामन्यात आफ्रिकेकडून इंग्लंडचा पराभव

सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात अमेरिका पराभूत

टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच (T20 World Cup) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अमेरिका संघाचा पराभव केला होता. या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 195 धावा केल्या होत्या. यानंतर अमेरिकेच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केला मात्र त्यांना विजयासाठी 18 धावा कमी पडल्या. 20 ओव्हर्सध्ये यूएसएचे फलंदाज 176 धावाच करू शकले. या पराभवानंतर वेस्टइंडिजच्या हातून दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग दोन पराभवांमुळे अमेरिकेची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज