इंग्लंडने रोखला विंडीजचा विजयरथ; सुपर 8 मधील सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय

इंग्लंडने रोखला विंडीजचा विजयरथ; सुपर 8 मधील सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय

England Beat West Indies : टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात आज इंग्लंडने दमदार खेळ करत (England beat West Indies) वेस्टइंडिजला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात इंग्लंडने सात विकेट राखून वेस्टइंडिजचा पराभव केला. या पराभवानंतर विंडीजची सुपर 8 फेरीतील पुढील वाटचाल कठीण झाली आहे. या सामन्यात फिलीप सॉल्टने 87 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. साखळी फेरीतील सर्व चार सामने जिंकणाऱ्या वेस्टइंडिजला या सामन्यात काही करता आले नाही. या सामन्यात इंग्लंडने एकतर्फी विजय मिळवला.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्टइंडिजने वीस ओव्हर्समध्ये 180 धावा केल्या. जॉन्सन चार्ल्सने 34 चेंडूत 38 धावा केल्या. यानंतर वेस्टइंडिजजच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली राहिली. फक्त 17.3 ओव्हर्समध्येच इंग्लंडने सामना जिंकला. विंडीजने चांगले टार्गेट दिले होते. मात्र त्यांच्या गोलंदाजांना या आव्हानाचा बचाव करता आला नाही. सुमार गोलंदाजीमुळे जिंकता येणारा सामनाही वेस्टइंडिजने गमावला.

अमेरिकेची झुंज अपयशी, सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला फिलीप सॉल्ट आणि कप्तान जोस बटलर यांनी चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. सामन्याच्या आठव्या ओव्हरमध्ये ही भागादारी तोडण्यात विंडीजला यश मिळालं. रोस्टन चेजने बटलरला बाद केले. बटलरने 22 चेंडूत 25 रन केले. यानंतर अकराव्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलने दुसरी विकेट मिळवून दिली.

यानंतर वेस्टइंडिजच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. फिलीप सॉल्ट आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी मिळून 97 धावांची विजयी भागादारी रचली. सॉल्टने सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या तर जॉनी बेयरस्टोने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. अशा पद्धतीने इंग्लंडने वेस्टइंडिजचा पराभव केला. या पराभवामुळे विंडीजची पुढील वाटचाल कठीण झाली आहे. या फेरीत विंडीजचे आणखी दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तसेच दुसऱ्या संघांच्या पराभवावर गणित अवलंबून राहणार आहे.

टीम इंडियाचा ‘यशस्वी’ पाठलाग; चौथ्या सामन्यात वेस्टइंडिजचा दणदणीत पराभव

सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात अमेरिका पराभूत

टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच (T20 World Cup) सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अमेरिका संघाचा पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 195 धावा केल्या होत्या. यानंतर अमेरिकेच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केला मात्र त्यांना विजयासाठी 18 धावा कमी पडल्या. 20 ओव्हर्सध्ये यूएसएचे फलंदाज 176 धावाच करू शकले. या पराभवानंतर या फेरीतील अमेरिकेची पुढील वाटचाल आता आणखी कठीण झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube