Eknath Khadse : निवडणूक लढणार का? एकनाथ खडसेंचं चकीत करणारं उत्तर

Eknath Khadse : निवडणूक लढणार का? एकनाथ खडसेंचं चकीत करणारं उत्तर

Eknath Khadse : मी यापुढे निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढण्याची इच्छा नाही. माझा विधानपरिषदेचा कार्यकाळ अजून बाकी आहे, अशी मोठी घोषणा आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. मी अजून पाच वर्षांसाठी विधानपरिषदेचा आमदार आहे. मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकारणातील व्यक्ती आहे सध्या मात्र माझा निवडणूक लढण्याकडे कल नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश अनेक दिवसांपासून रखडला आहे. यांसह अन्य राजकीय मुद्द्यांवर आज त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केले.

एकनाथ खडसेंचे राजकीय भवितव्य अनिश्चित; ‘या’ कारणामुळे भाजपमधील पुनरागमन रखडले

शरद पवारांनी मला सांगितलंय की एकदा दिलेली वस्तू आम्ही परत घेत नाही. आता त्यांच्याकडूनच मला अभय मिळालं आहे म्हटल्यानंतर बाकी जर कुणी माझ्या राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी काही देणंघणं नाही. मी एक राजकीय व्यक्ती आहे. मी अजून तरी राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेली नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. पण, आता मी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही.

खडसे पुढे म्हणाले, मी ज्यावेळी भाजपात वापसी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मुलगी रोहिणीला सोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र तिने राष्ट्रवादीत थांबणे पसंत केले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात भविष्य आहे असं तिला वाटतं. त्यामुळे तिने भाजपात येण्यास नकार दिला. सध्या रोहिणी खडसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारही करत असल्याचे एकनाथ खडसे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

रक्षा खडसेंच्या प्रचारात भाजपला मदत

महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी मी प्रचार करत आहेत. मी त्यांच्या प्रचारात मदत करत आहे. आता मतदारसंघात पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. मात्र लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात येथे कोणतीही नाराजी दिसत नाही. काही प्रमाणात अँटी इन्कम्बसी जाणवते पण भाजपला पुन्हा निवडून देण्यासाठी लोक उत्सुक आहेत, असेही खडसे म्हणाले.

माझ्या भाजपवापसीला कुणाचाही विरोध नाही

यानंतर खडसे यांनी त्यांच्या भाजपवापसीवरही भाष्य केलं. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे माझा पक्ष प्रवेश निश्चित आहे. राज्यात काही लोकांत नाराजी होती. आता सगळीकडेच तुमची कुणी स्तुती तर करू शकत नाही. या नाराजीला दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. भाजपात आल्यानंतर मला आणि गिरीश महाजनांना एकत्रित काम करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. पक्षाच्या हिताच्या आवश्यक असणारा आम्ही मिळून घेऊ. आता पक्षात प्रवेशा करण्यावरून कुणाचाही विरोध नाही. जो विरोध होता तोही आता कमी झाल्याचे खडसे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज