Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘भाजपनं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ देऊ नका असं ते म्हणतात. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जसा तसाच विरोधी पक्षही महत्वाचा असतो. एकही माणूस निवडून येऊ देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यात काही फरक नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.

शरद पवार गटाची तक्रार अन् भाजपनं शिंदे-अजितदादांचं नाव हटवलं; नेमका प्रकार काय? 

शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याआधी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. त्यांची आताची भाषणं पंतप्रधानपदाला शोभणारी नाहीत. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचं काय योगदान होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र तरीही मोदी नेहरुंवर टीका करत असतात.

आज धैर्यशील मोहितेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आज संध्याकाळी जयंत पाटील येथे येतील आणि पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख 16 एप्रिल आहे. सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांचा वळसे पाटलांना धक्का, निकटवर्तीय करणार अमोल कोल्हेंचा प्रचार

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज