शरद पवारांचा वळसे पाटलांना धक्का, निकटवर्तीय करणार अमोल कोल्हेंचा प्रचार
Shekhar Pachundkar Join Sharad Pawar Group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का दिला आहे. दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर (Shekhar Pachundkar) यांनी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार धमाका
शेखर पाचुंदकर आणि देवदत्त निकम यांनी आज पदाधिकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन प्रवेश केला. त्यांच्यावर शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शरद पवार यांनी शेखर पाचुंदकर यांच्याकडे सोपवली आहे.
शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. शेखर पाचुंदकर आता शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा अजित पवार गट आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात
पाचुंदकर गेली 20 वर्षे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काम करत होते. मात्र वळसे पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाचुंदकर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना पाठिंबा दिला. यानंतर पवारांनी वळसे पाटलांना त्यांच्याच होमपिचवर धक्का दिला.
कोल्हे विरुध्द आढळराव पाटील
शरद पवार गटाचे अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे या मतदारसंघातून राष्ट्रवादीने नुकतेच शिवसेनेतून अजित पवार गटात दाखल झालेले शिवाजी आढळराव पाटील हेही रिंगणात आहे.