अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार धमाका
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 1: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (BMCM) गुरुवारी 11 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर (Box Office) अजय देवगणच्या ‘मैदान’शी टक्कर झाली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील अशी अपेक्षा आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला (Bade Miyan Chote Miyan) चांगली ओपनिंग मिळताना दिसत आहे. अक्षय आणि टायगरचा ॲक्शन पॅक्ड चित्रपट पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला आहे, चला तर मग पाहूया?
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ पहिल्या दिवशी किती कमावणार?
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) फुल-ऑन ॲक्शन चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाच्या स्टारकास्टनेही त्याचे जोरदार प्रमोशन केले. अशा परिस्थितीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची जोरदार चर्चा रंगली होती. आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, त्याच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत 5.96 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अंतिम डेटा रात्री अपडेट केला होण्याची शक्यता आहे.
अक्षयच्या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळणार
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला 20-25 कोटींची ओपनिंग मिळू शकते. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांच्या मते, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 25 कोटी रुपयांची कमाई करेल आणि वीकेंडला कमाई वाढण्याची शक्यता आहे. ट्रेड एक्सपर्ट अक्षय राठी-”हा चित्रपट ईदला रिलीज होत आहे आणि या चित्रपटाला 20 कोटींहून अधिकची ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा आपण सर्वांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे 18-20 कोटी असेल आणि जास्तीत जास्त ते 25 कोटींपर्यंत पोहोचू शकेल, अक्षय आणि टायगर गर्दी खेचणारे असतील, तर दुसऱ्या दिवशी त्यात चांगली उसळी पडू शकते.
कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड? गळ्यातील लॉकेटचा फोटो समोर येताच सोशल मिडीयावर चर्चा
आगाऊ बुकिंगमधून 4.81 कोटी रुपयांची कमाई .
आगाऊ बुकिंगच्या बाबतीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने करोडोंचा गल्ला जमवला आहे. SACNL च्या अहवालानुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या पहिल्या दिवसासाठी 1 लाख 86 हजार 5शे 75 तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. यासह चित्रपटाने रिलीजपूर्वीच 4.81 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 3500 स्क्रीन्सवर रिलीज
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. हा ॲक्शन-थ्रिलर हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज झाला आहे. मात्र, हिंदी भाषिक प्रदेशात हा चित्रपट चांगला सुरु आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 3500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा रनटाइम 2 तास आणि 38 मिनिटे (158 मिनिटे) आहे आणि त्याला CBFC द्वारे U/A प्रमाणपत्र दिले गेले आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. अक्षय कुमार आणि टिग्क श्रॉफ यांच्याशिवाय मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय बोस यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.