Box Office: सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योध्दा’ने दाखवली जादू, जाणून घ्या तिसऱ्या दिवशीची कमाई

Box Office: सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योध्दा’ने दाखवली जादू, जाणून घ्या तिसऱ्या दिवशीची कमाई

Yodha Box Office Collection Day 3: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Siddharth Malhotra) सध्या ‘योध्दा’ (Yodha Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन महिने झाले आहेत. सिद्धार्थ हा पहिल्यांदाच अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेत्री राशि खन्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. यामध्ये अभिनेता कमांडोच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील त्याचा ॲक्शन अवतार चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडला होता. सकारात्मक प्रतिसादादरम्यान, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची गती मंदावली आहे, परंतु आता रविवारी तिसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत वाढ झाली आहे. पहिल्या वीकेंडला किती एकूण किती कमाई झाली चला तर मग पाहूया….

‘योद्धा’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4.1 कोटींची कमाई केली. यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी उसळी पाहायला मिळाली. पहिल्या शनिवारी 5.75 कोटींचा व्यवसाय केला. सोबतच रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी चांगला गल्ला कमावला आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘योद्धा’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी 7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह, ‘योद्धा’ची तीन दिवसांतील एकूण कमाई आता पहिल्या वीकेंडमध्ये 16.85 कोटींवर पोहोचली आहे.

Viral: प्रेरणा अरोरा आणि दिव्या खोसला यांच्यातील फोन कॉल झाला व्हायरल

‘सैतान’शी टक्कर

सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योध्दा’ला अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाशी स्पर्धा आहे. ‘शैतान’ रिलीज होऊन 10 दिवस झाले असून बॉक्स ऑफिसवर तो चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शिवाय ‘योद्धा’चा गल्ला देखील खूपच कमी झाला आहे.

मात्र, ‘योद्धा’च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सिद्धार्थसोबत दिशा पटानी आणि राशी खन्नासोबत रोनित रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. देशासाठी दहशतवादाशी लढणाऱ्या विमान अपहरणकर्त्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. यासह सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube