‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात

‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात

Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावत सभेतून मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.

सातारा सैनिक शाळेत विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 38,000 रुपये पगार

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2014 ला जो पंतप्रधान झाला त्याला आज तुम्ही शिव्या घालत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं आहे. एखादं कलम हटवलं म्हणजे राबवलं म्हणतात का? मोदी तुमची आम्हाला कीव करावीशी वाटते. तुम्हाला एवढा बुद्दू पंतप्रधान कधीपासून लागायला लागला? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी देशातील सनातनी हिंदुंना केला आहे.

पंतप्रधान मोदी दहा वर्षांत मागील इतिहासातच रेंगाळत बसले आहेत. जुना इतिहास उकरुन काढत आहेत. दहा वर्षांत अजूनही मोदी इतिहासात रेंगाळत बसले आहेत
दहा वर्षांत मोदींनी काय केलं ते सांगा ना? पंतप्रधान मोदींनी मागील दहा वर्षांत चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नाही. सर्वात मोठा डाकू कोण असेल तर तो मोदी इलेक्टोरल बॉंडमार्फत झाला असल्याचं निर्मला सीतारामण यांचे पती सांगत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

टायगर श्रॉफने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मधील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना लावलं ‘वेड’

तसेच 2024 नंतर 2029 ला निवडणूक होणारच नाही. सध्या भारताचा जो नकाशा आहे तो राहणार नाही. 2024 ते 2029 या कालावधीत भारतातील अनेक भागांत मणिपूरसारखंच घडणार असल्याचं निर्मला सीतारामण यांचे पती सांगत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला आहे.

नाना पटोलेंवर टीका…
काँग्रेसच्या सेनेचा प्रमुख म्हणतोयं की मी लढू शकत नाही, तर सैन्य कसंकाय लढणार आहे. भाजपविरोधी पक्ष जोपर्यंत भाजपला अंगावर घेत नाहीत. तोपर्यंत तुम्ही त्यांना आपटू शकत नाहीत, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रपूरमधून भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रतिभा धानोरकर या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते. पण, त्यांचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा काँग्रेसने त्यांच्याच पत्नीसाठी ही जागा दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube