यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार? …

यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार? …

Grammys 2024: ग्रॅमी पुरस्कार 2024 चा (Grammys 2024) कार्यक्रम रविवार 04 फेब्रुवारी 2024 रोजी ठेवण्यात आला आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर पुरस्कार ( Grammy Awards 2024) हा अभिनय आणि चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, त्याचप्रमाणे ग्रॅमी पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम लिटमस चाचणीतून उत्तीर्ण होते आणि जगभरातील संगीतांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. हे पुरस्कार विविध श्रेणींमध्ये वितरित केले जातात. 2024 हे वर्ष या पुरस्कार सोहळ्याची 66 वी आवृत्ती आहे.

ग्रॅमी 2024 कधी होत आहे? लॉस एंजेलिसमध्ये ग्रॅमी 2024 चे (Grammys 2024) आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 4 फेब्रुवारी 2024 रोजी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

लाइव्ह कुठे बघायचे? हा शो थेट पाहायचा असेल, तर तुम्ही तो CBS आणि Paramount Plus वर पाहू शकता. हा कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. भारतात त्याच्या थेट प्रक्षेपणाची वेळ सोमवारी सकाळी 7 वाजता असणार आहे. या शोचे लाइव्ह स्ट्रीमिंग Hulu Plus Live TV, YouTube TV आणि Fubu TV वर पाहू शकणार आहात.

कोण होस्ट करत आहे? यावेळी या मेगा इव्हेंटचे सूत्रसंचालन दक्षिण अमेरिकन कॉमेडियन लेखक ट्रेव्हर नोह करत आहेत. याआधी त्याने सलग तीन वेळा हा शो होस्ट केला आहे. शिवाय त्यांचीही दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याला सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बमसाठी नामांकन मिळाले आहे. अलीकडेच त्याने आपल्या नावावर एमी अवॉर्डही (Emmy Award) जिंकला आहे.

अनुष्का- विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा! माजी खेळाडूने दिली गोड बातमी

भारतही मागे नाही: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतीय संगीत देखील जगभरात खूप आवडते. आत्तापर्यंत अनेक भारतीय आहेत ज्यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यात पंडित रविशंकर, गुलजार, एआर रहमान, रिकी केज, झुबिन मेहता आणि फाल्गुनी शाह यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ॲबडन्स इन मिलेट्स या गाण्यातील गीतलेखनासाठी त्याला नामांकन मिळाले आहे. या गाण्याला फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी संगीत दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज