Grammy Awards जाहीर! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी उमटवली ग्रॅमीवर मोहोर, संगीतप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव
Grammy Awards 2024 : मनोरंजन आणि संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रॅमी 2024’ पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनी यावर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. दरम्यान, ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचाही दबदबा दिसून आला. यंदा चार भारतीय गायकांनी हा पुरस्कार पटकावला असून त्यात गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि तबलावादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचा समावेश आहे. गायिका मायली सायरसने तिच्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी जिंकला.
महाराष्ट्रासह 13 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, IMD चा इशारा
संगीत जगतातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. काल लॉस एंजेलिस येथे 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेव्हर नोआ याने सलग चौथ्यांदा ग्रॅमी अवॉर्ड्स होस्ट केले. यंदा भारतीय संगीतकारांनी या पुरस्कारांमध्ये बाजी मारली. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या अल्बने बाजी मारली.
ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कर्तव्यातील कसुरी भोवली
शक्ती बँडमधील कलाकारांना यावेळी ग्रॅमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शक्ती नावाच्या बँडने धिस मूव्हमेंट अल्बम तयार केला होता. या अल्बममध्ये आठ गाणी आहेत. या अल्बमला यावेळी ग्रॅमी देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये गिटारवादक जॉन मॅकलॉग्लिन, उस्ताद झाकीर हुसेन, गायक शंकर महादेवन, तालवादक व्ही सेल्वागणेश आणि व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Congrats Best Global Music Album winner – ‘This Moment’ Shakti. #GRAMMYs 🎶
WATCH NOW https://t.co/OuKk34kvdu pic.twitter.com/N7vXftfaDy
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) February 4, 2024
ग्रॅमीवर पुन्हा एकदा भारतीय संगीतकार, वादक आणि गायक यांची मोहोर उमटल्यानं तमाम भारतीय संगीतप्रेमींनी आनंद व्यक्त केला. ग्रॅमी जिंकल्यानंतर सोशल मीडियावरू विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स: मायली सायरस (फ्लॉवर्स
सर्वोत्कृष्ट अल्बम: SZA (SOS)
सर्वोत्तम परफॉर्मन्स : कोको जोन्स (ICU)
रॅप अल्बम: किलर माइक (मायकेल)
सर्वोत्कृष्ट आफ्रिकन संगीत परफॉर्मन्स: टायला (वॉटर)
पॉप ड्युओ/ग्रुप परफॉर्मन्स: एसझेडए, फोबी ब्रिजर्स (घोस्ट इन द मशीन)
संगीत व्हिडिओ: द बीटल्स, जोनाथन क्लाइड, एम कूपर (आय एम ओनली स्लीपिंग)
ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स : झाकीर हुसेन, बेला फेक, एडगर मेयर (पश्तो)
अल्टरनेटीव म्युझिक अल्बम: बॉयजिनियस (द रेकॉर्ड)
ग्लोबल म्युझिक अल्बम: शक्ती (द मोमेंट)
प्रोड्युसर ऑफ द इयर, नॉन-क्लासिकल: जॅक अँटोनॉफ
प्रोड्युसर ऑफ द इयर, क्लासिकल: अलेन मार्टोन
बेस्ट इंजिनिअर्ड अल्बम, क्लासिकल : रिकार्डो मुटी आणि सिम्फनी ऑर्केस्ट्रा
बेस्ट ब्लूग्रास अल्बम: मॉली टर्टल आणि गोल्डन हायवे (सिटी ऑफ गोल्ड)
बेस्ट कंटेम्पररी इंस्ट्रमेंटल अल्बम: बेला फेक, झाकीर हुसेन, एडगर मेयर, राकेश चौरसिया (एज वी स्पीक)
बेस्ट जॅझ परफॉर्मन्स अल्बम: बिली चाइल्ड्स (द विंड ऑफ चेंज)
बेस्ट जॅझ परफॉर्मन्स : समारा जॉय (टाइट)
बेस्ट प्रोगेसीव्ह R&B अल्बम : SZA (SOS)