Zakir Hussain Died : मोठी बातमी! तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन

  • Written By: Published:
Zakir Hussain Died  : मोठी बातमी! तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन

Zakir Hussain Died  :  मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना अमेरिकन शहरातील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून ते हृदयविकाराने त्रस्त होते. झाकीर हुसैन यांना 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

झाकीर हुसैन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत उपचार सुरू होता. गेल्या काही वर्षांपासून ते हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. सुमारे 2 वर्षांपूर्वी त्यांच्या हृदयात ब्लॉकेजमुळे त्यांना स्टेंटही बसवण्यात आला होता.

झाकीर हुसैन यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.

तसेच ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’साठी त्यांना 2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे होते. उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.

Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार महायुती सरकारचं खातेवाटप

झाकीर हुसैन यांनी तीन वर्षांचे असताना पहिल्यांदा तबला वाजवला होता त्यानंतर हळूहळू त्यांनी सराव सुरू केला आणि वयाच्या सातव्या वर्षी तबला वादनात पारंगत झाले . वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी आपले कौशल्य लोकांसमोर दाखवायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube