Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार महायुती सरकारचं खातेवाटप

  • Written By: Published:
Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार महायुती सरकारचं खातेवाटप

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे खातेवाटप पुढील दोन ते तीन दिवसात होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह गिरीश महाजन (Girish Mahajan) उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, विरोधक जरी संख्येने कमी असले तरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आले तर त्यांची उत्तरे दिले जातील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे त्यामुळे सभागृह रेटून आम्ही चालवणार नाही असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आज मंत्रिमंडळाला अंतिम स्वरूप मिळाला आहे. पुढील दोन तीन दिवसात मुख्यमंत्री सर्वांना खाते वाटप करतील आणि आमचं सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र राहिल असं आश्वासनं देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला. तर दुसरीकडे आज झाल्याने मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून 19 आमदारांनी तर शिवसेनेकडून 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

भाजपकडून आज चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे आणि आकाश फुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर माधुरी मिसाळ, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे , आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर इंद्रणिल नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

दाऊद इब्राहिमला धक्का, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणात दानिश मर्चंटला अटक

शिवसेनेकडून आज गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरतशेठ गोगावले आणि प्रकाश अबिटकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube