आरक्षणाची मर्यादा ओलांडली ; शिर्डी नगरपंचायत निवडणुकीवर टांगती तलवार
Shirdi Nagar Panchayat Election:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे.
Municipal Councils and Shirdi Nagar Panchayat Election:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुनावणी सुरू आहे. मर्यादा ओलंडणारा नगरपालिका व नगरपंचायतीची यादी आता समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीचा ( Shirdi Nagar Panchayat) या यादीत समावेश आहे.
राज्यातील चाळीस नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींमध्ये ही मर्यादा ओलांडण्यात आली. तर राज्यातील 17 जिल्हा परिषदा आणि दोन महानगरपालिकांम्धेय आरक्षणाची मर्यादा ओलांडली आल्याचे आकडेवारीवरून उघडकीस येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केवळ शिर्डी नगरपंचायतीचा यात समावेश आहे. शिर्डी नगरपंचायतीमध्ये 52.17 टक्के आरक्षण टाकले आहे. शिर्डी नगरपंचायतीमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येथे अनुसूचित जातीतील महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. शिर्डी नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यात 50 टक्के आरक्षणाबाबत पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी (28 नोव्हेंबरला) होणार आहे. न्यायालयाने आरक्षणावरून निवडणूक स्थगित केल्यास येथील निवडणुकीवर टांगली तलवार आहे. (Shirdi Nagar Panchayat General Elections reservation above 50 percent and Supreme Court)
राज्य सरकारला दावा काय ?
याबाबत विकास गवळी यांना याचिका दाखल केलीय. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे, अशी याचिका आहे. तर बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण
चिखलदरा- 75 टक्के
जव्हार- 70 टक्के
कन्हान पिंपरी- 70 टक्के
बिलोली- 65 टक्के
त्र्यंबक- 65 टक्के
पिंपळगाव बसवंत- 64 टक्के
पुलगाव- 61.90 टक्के
तळोदा- 61.90 टक्के
इगतपुरी- 61.90 टक्के
बल्लारपूर- 61.76 टक्के
पाथरी- 60.87 टक्के
पूर्णा- 60.87 टक्के
मनमाड- 60.61 टक्के
कुंडलवाडी- 60 टक्के
नागभीड- 60 टक्के
धर्माबाद- 59.09 टक्के
घुघुस- 59.09 टक्के
कामठी- 58.82 टक्के
नवापूर- 56.52 टक्के
गडचिरोली- 55.56 टक्के
उमरेड- 55.56 टक्के
वाडी (नागपूर)- 55.56 टक्के
ओझर- 55.56 टक्के
भद्रावती- 55.17 टक्के
उमारी (नांदेड)- 55 टक्के
साकोली (शेंदुरवाफा)- 55 टक्के
चिमूर- 55 टक्के
आरमोरी- 55 टक्के
खापा (नागपूर)- 55 टक्के
पिंपळनेर- 55 टक्के
आर्णी- 54.55 टक्के
पांढरकवडा- 54.55 टक्के
डिगडोह(नागपूर)- 54-17 टक्के
दौंड- 53.85 टक्के
राजुरा- 52.38 टक्के
देसाईगंज- 52.38 टक्के
बुटीबोरी- 52.38 टक्के
ब्रह्मपुरी – 52.17 टक्के
शिर्डी- 52.17 टक्के
दर्यापूर- 52 टक्के
कटोल- 52 टक्के
यवतमाळ- 51.72 टक्के
तेल्हारा- 50 टक्के
