Ahmednagar Politics : विधानसभेपूर्वीच वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्यावर मोठी जबाबदारी

Ahmednagar Politics : विधानसभेपूर्वीच वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्यावर मोठी जबाबदारी

Utkarsha Rupawate : नुकत्याच झालेल्या शिर्डी लोकसभ (Shirdi Lok Sabha) मतदारसंघाच्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) विजयी झाले. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे माजी खा. सदाशिव लोखंडे उभे होते. मात्र, शिवसेनेच्या दोन गटामध्ये होणाऱ्या या लढतीला वंचितने (VBA) तिरंगी केलं. या निवडणुकीला वंचितकडून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupawate) उभ्या होत्या. रुपवते यांनी चांगले मताधिक्य देखील मिळवले. रुपवते यांच्या कामाची दाखल घेत वंचितकडून त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.

‘स्वतःला हिंदू म्हणणारे …,’ राहुल गांधींचा हिंदू धर्मावर वादग्रस्त विधान, मोदीही नाराज 

वंचित पक्षाकडून काही प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये प्रभावी वक्तृत्व, शैक्षणिक पार्श्वभूमी व मतदार संघातील विविध समस्यांची जाण असलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्याकडे वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्याकडे पक्षाच्या प्रवक्ते पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. या निवडणुकीत युवा, तडफदार महिला नेतृत्व म्हणून उत्कर्षा रुपवते यांनी केलेली कामगिरी आणि संघटन पाहता त्यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे.

Mirzapur 3: काय सांगता! ‘मिर्झापूर 3’ मध्ये ‘पंचायत’ मधल्या ‘सचिवजीं’ची एन्ट्री? गुड्डू भैयाने केला खुलासा 

रुपवते विधानसभा लढण्याची शक्यता…
काँग्रेसमध्ये दीर्घकाळ असणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला आणि वंचिककडून लोकसभा निवडणूक लढवली होती. अत्यतं कमी वेळेमध्ये देखील रुपवते यांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही बलाढ्य उमेदवारांना घाम फोडला. मात्र या निवडणुकीत रुपवते यांचा पराभव झाला. पराभवानंतरही रुपवते यांनी खचून न जाता नागरिकांच्या भेटीगाठी घेणे सुरूच ठेवले. यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी रुपवते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रुपवते ‘या’ मतदारसंघातून लढणार
लोकसभा निवडणुकीमध्ये रुपवते यांना श्रीरामपूर मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले. याठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत उत्कर्षा रूपवते या वंचित बुहजन आघाडीच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातच सध्या रुपवते यांच्याकडून नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांची प्रश्न जाणून घेतली जात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका या अद्याप जाहीर झाल्या नाहीत. यामुळे येणाऱ्या काळात नक्की काय राजकीय घडामोड घडणार, हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube