Mirzapur 3: काय सांगता! ‘मिर्झापूर 3’ मध्ये ‘पंचायत’ मधल्या ‘सचिवजीं’ची एन्ट्री? गुड्डू भैयाने केला खुलासा

Mirzapur 3: काय सांगता! ‘मिर्झापूर 3’ मध्ये ‘पंचायत’ मधल्या ‘सचिवजीं’ची एन्ट्री? गुड्डू भैयाने केला खुलासा

Mirzapur Season 3 Update: प्रेक्षक मिर्झापूर सीझन 3 ची (Mirzapur Season 3) आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकजण त्याच्या रिलीजची तारीख जवळ येण्याची वाट पाहत आहे. मिर्झापूरचे गेले दोन सिझन धमाकेदार ठरले आहेत, त्यामुळेच आता तिसऱ्या सिझनसाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. ही या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरीजपैकी एक आहे. काही वेळापूर्वी त्याचा ट्रेलर रिलीज झाला होता, जो पाहिल्यानंतर प्रतीक्षा करणेही कठीण होत आहे. आता मिर्झापूर सीझन 3 वर आणखी एक अपडेट समोर आली आहे. शोमध्ये अली फजल (Ali Fazal) आणि पंकज त्रिपाठीसोबत (Pankaj Tripathi) ‘पंचायत सीझन 3’ स्टार (Panchayat Season 3) देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)


मिर्झापूर सीझन 3 मध्ये पंचायत अभिनेत्याची एन्ट्री

मिर्झापूरचा सीझन 3 ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर 5 जुलै रोजी रिलीज होणार आहे. पुढच्या आठवड्यातबद्दल सतत वाढत चाललेल्या उत्साहादरम्यान, आता तुमच्यासाठी सीझन 3 च्या कलाकारांबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. पंचायत सीझन 3 चा स्टार मिर्झापूर 3 मध्ये दिसणार असल्याची बातमी आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून जितेंद्र कुमार म्हणजेच त्याचा सचिव आहे.

मिर्झापूर 3 मधील सचिवाचे पात्र

‘मिर्झापूर 3’ मध्ये सचिवाची भूमिका काय आहे? नुकतचं गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलने शोच्या पात्रांबद्दल अपडेट दिले आहे. अली फजलने एएनआयला सांगितले की, गँगस्टर ड्रामामध्ये जितेंद्रची एंट्री क्रॉस-प्रमोशनचा भाग असणार आहे. बातमी अशी आहे की सचिव जी अर्थात जितेंद्र कुमार काही कागदपत्रांसाठी मिर्झापूरला येणार आहेत. कारण त्यांना कालिन भैय्या (पंकज त्रिपाठी) च्या मृत्यूबद्दल पुरावे लागणार आहेत. जितेंद्र कुमार मिर्झापूर 3 मध्ये दोन भागांसाठी असणार आहेत.

Mirzapur 3: प्रतीक्षा संपली! क्राईम थ्रिलर वेब सीरीज मिर्झापूर सीझन’च्या ट्रेलर रिलीजची तारीख आली समोर

विजय वर्मा यांची भूमिका बदलली आहे का?

विजय वर्मा यांनीही अलीकडेच मिर्झापूर 3 मधील भूमिकेबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो म्हणाला, ‘मी सीझन 2 मध्ये जुळ्या भावांची भूमिका केली होती. एक अभिनेता म्हणून, दोन पात्रे साकारणे आव्हानात्मक होते, ज्यामुळे मला त्यांना वेगळे पाहण्याचा आणि एकमेकांशी संवाद साधण्याचा दृष्टीकोन मिळाला. या सीझनमधलं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते दोघांनाही एका पात्रात बांधणं. आता हा सीझन पाहणे खूप रंजक असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज