Mirzapur The Movie च्या खास स्क्रीनिंगला अमृता फडणवीस आणि सुप्रिया सुळेंची उपस्थिती

Mirzapur The Movie :  एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Mirzapur The Movie

Mirzapur The Movie :  एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पंकज त्रिपाठी, दिव्येंदु आणि अली फजल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ‘मिर्झापूर’ फ्रँचायझीला मोठ्या पडद्यावर घेऊन आला आहे. चित्रपटाच्या शानदार थिएट्रिकल रनदरम्यान निर्माते रितेश सिधवानी आणि दिग्दर्शक गुरमीत सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यासाठी खास स्क्रीनिंगचे आयोजन केले. यावेळी अभिनेता दिव्येन्दु देखील उपस्थित होता.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ (Mirzapur The Movie) ला देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जगभरात चित्रपटाने 223 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. गुरमीत सिंह दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि लेखन पुनीत कृष्णा यांनी केले आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सह-निर्माते आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ 4 सप्टेंबर 2026 रोजी हिंदी आणि तेलुगू भाषेत सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

Anil Kapoor च्या ‘इंडिया के टॉप 1%’ला मिळाली पहिली विजेती; बिजल शाहने रचला इतिहास-

follow us