ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कर्तव्यातील कसुरी भोवली

  • Written By: Published:
ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कर्तव्यातील कसुरी भोवली

PSI Sachin Gadekar Suspend : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाती ललित कला केंद्राच्या (Lalit Kala) आवारात झालेल्या तोडफोडीनंतर या घटनेची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. सचिन शंकर गाडेकर (Sachin Shankar Gadekar) असे निलंबित पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य… 

पोलीस निरीक्षक गाडेकर हे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणावर आधारित नाटक सादर केले. नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले. त्यावेळी ललित कला केंद्राच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर शनिवारी (3 फेब्रुवारी) सायंकाळी 5.55 च्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राच्या आवारात घोषणाबाजी करत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या, कुंड्या फोडून नुकसान केले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गाडेकर ललित कला केंद्रात बंदोबस्तास होते.

विद्यापीठातील तोडफोड प्रकरणात पीएसआयवर निलंबनाची कारवाई; माहिती देण्यास दिरंगाई भोवली 

ललित कला केंद्रात परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड अॅक्शन फोर्स) ला पाचारण करण्यात आले नाही. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांसह नियंत्रण कक्षाला या घटनेची त्वरीत माहिती देण्यात आली नाही. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यात कुसरी केली. अशा बेजबाबदारपणामुळे पोलिस दलाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप गाडेकर यांच्यावर करण्यात आला. पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत गाडेकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज