PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन

PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन

PM Narendra Modi Song For Grammy Awards 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या जोरदार चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते ‘एबंडेंस इन मिलेट्स’ (Abundance in Millets) या गाण्याच्या गीतलेखनामुळे जोरदार चर्चेत आले होते. आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आला आहे. (Grammy Awards 2024) धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावेत यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याला जागतिक पातळीवरील मनोरंजनक्षेत्रात महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन देण्यात येणार आहे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. बाजरीसारख्या पौष्टिक धान्याचा प्रचार व्हावा, यासाठी पंतप्रधानांनी हे गाणं लिहिलं आहे. पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय- अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहच्या मदतीने पंतप्रधान मोदींनी हे गाणं लिहिलं आहे. ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याबद्दल बोलत असताना फाल्गुनीने ट्वीट केलं होतं की,”धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्‍यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हे गाणं लिहिलं आहे. धान्याचं सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि शरीर तंदुरुस्त राहायला मदत होत असते. भाजरीसारखं धान्य हे अतिशय पौष्टिक आहे. तसेच आरोग्यदायी आहे. अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमारी दूर करण्याच्या महत्त्वाच्या ध्येयाला या गाण्यातून सर्जनशीलतेची जोड मिळाली असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

Shah Rukh Khan: किंग खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; दिवाळीच्या मुहूर्तावर ‘डंकी’चं नवं पोस्टर रिलीज

फाल्गुनी शाह आणि तिचे पती आणि गायक गौरव शाह यांनी ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. फाल्गुनी शाह फालू या नावाने ओळखल्या जात असतात. युट्यूबवर हे गाणं सध्या चाहते ऐकू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं हे गाणं चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरलं आहे. ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्यासह आणखी ६ गाण्यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन जाहीर करण्यात आले आहे. फालू शाहला ग्रॅमी पुरस्कारासाठी आजवर अनेकवेळा नामांकन जाहीर करण्यात आले आहे. फालूताला 2022 मध्ये ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज