PM Narendra Modi : “मेट्रो ही आधुनिक भारताची नवी लाईफलाईन, देशात 800 किमीपेक्षा जास्त मेट्रोचं नेटवर्क”

PM Narendra Modi : “मेट्रो ही आधुनिक भारताची नवी लाईफलाईन, देशात 800 किमीपेक्षा जास्त मेट्रोचं नेटवर्क”

पुणे : भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावायचे असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचे (Public transport) आधुनिकीकरण केले पाहिजे. 2014 पर्यंत मेट्रोचे जाळे 250 किमीपेक्षा कमी होते. आता हे नेटवर्क देशात 800 किमीपेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये देशात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो (Metro) सेवा होती, आता 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार आवश्यक असल्याचं सांगत महाराष्ट्राचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सांगितलं. (PM Narendra Modi inaugurated pune metro Metro is the new lifeline of modern India metro network is more than 800 km)

पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. त्यावेळी पीएम मोदी बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत पुणे शहराचे मोठे योगदान आहे. पुणे शहरासाठी अनेक क्रांतिकारकांचे योगदान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे शहर आहे. पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. त्यामुळं देशातील शहरांमध्ये मेट्रो सेवेचा विस्तार करण्यात येत आहे. रस्ते, पूल, आदी कामे वेगाने सुरू आहेत. 2014 पर्यंत मेट्रोचे जाळे 250 किमीपेक्षा कमी होते. आता हे नेटवर्क देशात 800 किमीपेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये देशात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो सेवा होती, आता 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क आहे. पुणे शहरात 24 किलोमीटरची मेट्रो पूर्ण झाली आहे.

Movies Release In August 2023: ‘रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका’; ‘या’ महिन्यात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी 

ते म्हणाले, देशातील 20 शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. पुणे, नागपूरमध्ये मेट्रोचे जाळे सुरू झाले आहे. मेट्रो ही आधुनिक भारताची नवी लाईफलाईन बनली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार आवश्यक आहे. रेल्वे विकासासाठी १२ पट अधिक खर्च केल्या जातोय.

राज्यात शेकडो स्टार्टअप्स आहेत. आता एक लाख स्टार्टअप्स आहेत. आम्ही डिजिटल पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत.
त्यात पुण्याची महत्वाची भूमिका राहिली. जगातील सर्वात वेगवान 5G नेटवर्क भारतात उभारले गेले आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. आणि देशाचा विकास झाला तर महाराष्ट्राला लाभ होईल. जगभरात लोक भारताच्या विकासाची चर्चा करत आहेत.

दरम्यान, यावेळी बोलतांना मोदींनी कर्नाटक काँग्रेसवर टीका केली आता कर्नाटक सरकारकडे बेंगळुरूच्या विकासासाठी पैसा नाही. कर्नाटकमधील विकासकामे ठप्प झाल्याचं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube