Movies Release In August 2023: ‘रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका’; ‘या’ महिन्यात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Movies Release In August 2023: ‘रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका’; ‘या’ महिन्यात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Movies Release In August 2023 : सिनेप्रेमींसाठी ऑगस्ट (August) महिना खूपच हटके असल्याचे पाहायला मिळणार आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जसे की, सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘ओएमजी 2’ (OMG 2) पर्यंत अनेक हटके सिनेमांचा सहभाग आहे.

सुभेदार (Subhedar) कधी होणार रिलीज?
‘सुभेदार’ मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाची सिनेप्रेमींना मोठी उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे. अजय पुरकर या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. हा सिनेमा येत्या १८ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


गदर 2 (Gadar 2) 
‘गदर 2’ या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. आता हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. अनिल शर्माने (Anil Sharma) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असल्याचे सांगितले जात आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Amisha Patel) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ‘गदर 2’ हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सनी तारा सिंहच्या आणि अमीषा पटेल सकीनाच्या भूमिकेत झळकणार आहे.

ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2)
२०१९ मध्ये आलेला ‘ड्रीम गर्ल’ हा सिनेमा जोरदार गाजल्याचे पाहायला मिळालं होत. आता चाहत्यांच्या या सिनेमाचा दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागल्याची पाहायला मिळत आहे. ‘ड्रीम गर्ल 2’चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून चाहत्यांना आता या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमा पूजा भट्ट आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत.

Mitali Mayekar: सिद्धार्थ- मिताली आईबाबा होणार? अभिनेत्रीची ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

ओएमजी 2 (OMG 2)
खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा ‘ओएमजी’ (OMG) हा बहुचर्चित सिनेमा २०१२ मध्ये चाहत्याच्या भेटीला आला होता. खिलाडीच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत या सिनेमाची गणना होते. आता ‘ओएमजी 2’ या सिनेमात खिलाडीचा महादेवाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्याच्याबरोबर पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तारीक (Tarik)
‘तारीक’ (Tarik) या सिनेमामुळे अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) जोरदार चर्चेत आला आहे. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अरुण गोपालनने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच जॉन स्वत: या बहुचर्चित सिनेमाचा निर्मातादेखील आहे.

अकेली (Akelli)
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाकडे अनेक प्रोजेक्ट असल्याचे पाहायला मिळत. परंतु तिच्या आगामी सिनेमांच्या यादीत ‘अकेली’ या सिनेमाचा देखील समावेश आहे. हा सिनेमा १८ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘अकेली’चं मोशन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले असून चाहत्यांना आता सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube