Ashok Saraf : कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सराफ कुटुंबाने केला रंगकर्मींचा गौरव
Senior Backstage Artist : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ हे त्यांच्या कित्येक वर्षांपासूनच्या प्रदिर्घ कारकीर्दीसह मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी अनेक काम करत असतात. त्यात आताा त्यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा सन्मान केला आहे. (Actor Ashok Saraf and family honored Senior Backstage Artist )
Pune News : पुणेकरांनो मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढली, महापालिकेने घेतला मोठा निर्णय…
यावेळी या कार्यक्रमावर बोलताना अभिनेते अशोक सराफ म्हणाले की, रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा आम्ही सन्मान केला आहे. सराफ कुटुंबाने केलेली ही मदत नसून एक ‘भेट’आहे. यामुळे या सगळ्यांना काही मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल,अशा भावना व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला जाण्यावर शरद पवार ठाम; महाविकास आघाडीत संभ्रम
या सोहळ्यात रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि बॅकस्टेज कलाकार अशा 20 जणांचासन्मानचिन्ह आणि 75 हजार रोख रुपये देऊन सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’पुस्तकासाठीच्या प्रायोजकत्व निधीचा विनियोग या कलावंतांच्या सन्मानासाठी करण्यातआला. ही संकल्पना निवेदिता सराफ यांचीअसून भाऊ सुभाष सराफ यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिल्याचे अशॊक सराफ यांनीसांगितले. संकल्पना यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना चांगल्या कामासाठी आवर्जून प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा, अशीआशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगलेल्या या सोहळ्यात सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, शामराव विठ्ठल कोऑप.बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, अल्कॉनचे अनिल खंवटे, डॉ. संजय पैठणकर या मान्यरांसोबत दिग्दर्शक विजय केंकरे, विनय येडेकर, संजय मोने, मीना नाईक, सुकन्या कुलकर्णी,श्रीपाद पद्माकर, दिलीपजाधव, मीनाकर्णिक, आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘ग्रंथाली’चे विशेष सहकार्य या सोहळ्याला लाभले होते.
सदर सोहळ्यात श्रीरंगभावे, मानसीफडके यांनी नाट्यगीते सादर केली. अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर या कार्यक्रमात ज्यांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये उपेंद्र दाते (अभिनेते), बाबा (सुरेश) पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार), अर्चना नाईक (अभिनेत्री), वसंत अवसरीकर (अभिनेते), दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री), नंदलाल रेळे (ध्वनिसंयोजक), अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते), प्रकाश बुद्धिसागर (दिग्दर्शक), पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका), वसंत इंगळे (अभिनेते), सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते) , किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक), शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत), हरीश करदेकर (नाट्यकलावंत), सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक), विष्णू जाधव (नेपथ्य साहाय्यक), एकनाथ तळगावकर (नेपथ्य सहायक), रवींद्र नाटळकर (नेपथ्य सहायक), विद्या पटवर्धन (अभिनेत्री), उल्हास सुर्वे (नेपथ्य सहायक) यांचा समावेश आहे.