Pune News : पुणेकरांनो मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढली, महापालिकेने घेतला मोठा निर्णय…
Pune News : पुणे महापालिका(PMC) हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मालमत्ता कर भरण्याची आजची शेवटची तारीख होती. मात्र, आता महापालिकेने 2 ऑगस्टपर्यंत ही तारीख वाढवली आहे. (The property tax payment deadline has been extended municipal corporation has taken a big decision)
Pune News : ‘त्या’ दहशतवाद्यांचं रत्नागिरी कनेक्शन! एटीएसकडून धक्कादायक माहिती उघड
पुण्यातील नागरिकांसाठी मालमत्ता भरण्याची आजची शेवटची तारीख होती. तसेच सर्वसामान्य कर भरणाऱ्यांसाठी 5 टक्के सूट देण्याचाही आजचा शेवटचा दिवस होता. तर थकबाकीदारांना अतिरिक्त 2 टक्के दंड भरावा लागणार होता. त्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी पुणेकर तुटून पडल्याचं दिसून आलं होतं. अशावेळी सर्व्हरच्या अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता. नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
या अडचणींबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाकडून पाऊलं उचलण्यात आली. संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं निदर्शनास आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पुणे महापालिकेकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेकडून 15 मे ते 31 जुलै या कालावधीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना 5 ते 10 टक्के सवलत दिली होती. त्यानंतर अनेक नागरिकांनी या सवलतीचा फायदा घेत मालमत्ता कर भरण्यावर जोर दिला होता. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत चांगलीच भर पडलीयं. या कालावधीत 1100 कोटींपेक्षा अधिक वसुली झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आता महापालिका प्रशासनाे मालमत्त कर भरण्याच्या मुदतीत वाढ केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोणत्याही अडचणींशिवाय नागरिकांना मालमत्ता कर भरता येणार आहे.