Pune News : ‘त्या’ दहशतवाद्यांचं रत्नागिरी कनेक्शन! एटीएसकडून धक्कादायक माहिती उघड

Pune News : ‘त्या’ दहशतवाद्यांचं रत्नागिरी कनेक्शन! एटीएसकडून धक्कादायक माहिती उघड

Pune News : पुण्यातील कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हे दहशतवादी हॉटेल किंवा रहदारीच्या वस्तीमध्ये नाहीतर टेन्टमध्येच राहत असल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच एटीएसकडून रत्नागिरीतून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापुरच्या जंगलात बॉम्बस्फोटची चाचणी केल्याचं एटीएसने उघड केलं होतं. त्यानंतर आता एटीएसकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये प्रवेश नाकारला

पुण्यातून दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर अहमदनगर पुण्यासह इतर जिल्ह्यात एटीएसच्या टीमने तपास केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातूनही दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आत्तापर्यंत एटीएसने एकूण 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. तपासाअंती त्यांच्याकडून एटीएसला ठोस पुरावे मिळालेले आहेत.

या प्रकरणी आरोपींना रोख पैसे देणे-घेणे असा व्यवहार करण्यात आल्याचंही उघड झालं असून अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी आयटी इंजिनियर आहे. त्याला हे पैसे कुठून मिळत होते? याची माहिती अद्याप उघड झाली नसून आतापर्यंत 500gb डेटा ATS च्या हाती लागला आहे. तसेच ड्रोन आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य देखील
एटीएसकडून जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ड्रोनचे फुटेज एटीएसने लॅबला पाठवले आहे.

Chandrakant Patil : आगामी लोकसभेत मोदीच पंतप्रधान, मोदींशिवाय समोर दुसरं आहे तरी कोण?

दहशतवाद्यांकडून एटीएसने लॅपटॉप, व्हिडिओ, बुक, मल्टिपल पुस्तके ड्रोन फुटेज, असा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासामध्ये पुण्यातला कोंढवा हा संवेदनशील असून पोलीस आता सतर्क झाले आहेत. अधिक तपासासाठी एटीएसचं पथक परराज्यात रवाना झाले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आरोपींकडून कुठे घातपात करण्याचा प्लॅन होता काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून हे आरोपी स्वतःच्या टेन्टचा उपयोग बाहेर राहण्यासाठी करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींपैकी एकही दहशतवादी बारावी पास नसल्याचं समोर आलं आहे.

नाकाबंदीदरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर ताब्यात घेतलेल्यांचा एटीएसकडून कसून तपास करण्यात आला. या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. दहशतवाद्यांचं कुठे कनेक्शन आहे? याचा तपास एटीएसच्या पथकाकडून केला जात आहे. त्यासाठी एटीएसचे पथक परराज्यात रवाना झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube