आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये प्रवेश नाकारला

आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये प्रवेश नाकारला

IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार खाल्ल्यावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला होता.

कॅन्टीनच्या भिंतींवर पोस्टर चिकटवले
आयआयटी पवईमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात वसतिगृह कॅन्टीनमध्ये 12 वा.च्या सुमारास ही घटना घडली. या विद्यार्थ्याने सांगितले की, काही विद्यार्थ्यांनी कॅन्टीनच्या भिंतींवर पोस्टर चिकटवले आहेत की “येथे फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे” मांसाहार करणाऱ्यांना लोकांना कॅन्टीनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थी संघटनेने पोस्टर्स काढले
विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या आरटीआयमध्ये दिसून आले की संस्थेकडे अधिकृत अन्न धोरण नाही. खाद्यपदार्थ खाण्यावर विद्यार्थ्यांची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था संस्थेत अजूनही प्रचलित आहे. विद्यार्थी संघटनेने या घटनेचा निषेध करणारे पोस्टर्स फाडून टाकले आहे.

Sangli News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; तर काँग्रेसनेही सांगितली निषेधाची तारीख

विद्यार्थ्यांच्या एका गटाने सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली की हा कायदा कॅम्पसमध्ये ठराविक वर्गाचे श्रेष्ठेत्व सांगणारा आहे आणि दुर्लक्षित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांशी भेदभाव करतो. दुसरीकडे आयआयटी पवईचे संचालक आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

2018 मध्येही व्हेज, नॉनव्हेज असा वाद झाला होता
आयआयटी बॉम्बेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज खाण्याचा वाद वर्षानुवर्षे जुना आहे. यापूर्वी 2018 मध्ये वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये अशी घटना उघडकीस आली होती. जेव्हा विद्यार्थ्यांना येथे ईमेलद्वारे सांगण्यात आले आहे की जे मांसाहारी आहेत त्यांना प्लेट्समध्ये त्यांचे ताट मिसळू नये असे सांगण्यात आले आहे.

देशाचा जीडीपी जैन समाजाभोवतीच आहे…; फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होणार?

मेसच्या प्रमुखाने विद्यार्थ्यांना हा मेल पाठवला होता, ज्यामध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांनी फक्त ट्रे प्लेट वापरावी, मुख्य प्लेटमध्ये त्यांची प्लेट मिसळू नये, असे सांगण्यात आले होते. अशा निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube