Sangli News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; तर काँग्रेसनेही सांगितली निषेधाची तारीख
सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करुन त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडेंनी केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. भिडे यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरातील सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता भिडेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करुन विधानाचं समर्थन केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
‘आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक’; राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
अमरावतीतल्या एका कार्यक्रमादरम्यान संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला आहे. एवढचं नाहीतर थेट विधानसभेतही काँग्रेसच्या नेत्यांनी भिडेंच्या विधानावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळाले. भिडेंच्या विधानानंतर विधानसभेत काँग्रेसचे नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर शिंदेंसह भाजपचे मानले आभार?
या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये रविवारी सकाळी शिवप्रतिष्ठानचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. संभाजी भिडेंच्या विधानाची मुळ चित्रफित पाहुन खातरजमा करण्याबाबत कार्यकर्त्यांनी म्हणणं मांडलं आहे. तसेच काही समाजकंटकांकडून भिडे गुरुजींवर चिखलफेक करण्यात येत आहे. अमरावतीत तर गुन्हाही दाखल झाला आहे. तरीही आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचा पवित्रा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घेतला.
राजीव गांधी ते लालकृष्ण अडवाणी : ‘डायरी’मुळे राजकारण पणाला लागलेली ‘5’ प्रकरण
दरम्यान, संभाजी भिडे गुरुजींचा अवमान आम्ही सहन करणार नसून कायम भिडे गुरुजींच्याच पाठिशी ठामपणे उभं राहणार असल्याचं ग्वाहीच शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार यांनी दिला आहे. यावेळी मिलिंद तानवडे, राहूल बोळाज, अंकूश जाधव, बापू हरिदास, सिध्दार्थ पेंडूरकर यांच्यासह रागिणी वेलणकर, एम. आर. कुलकर्णी, शकुंतला जाधव आदी महिलांसह शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे संभाजी भिडेंचं समर्थन तर दुसरीकडे आता पुरोगामी संघटनांनीही प्रत्युत्तरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी भिडेंच्या विधानाचा निषेध करण्यासाठी सोमवारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आशिष कोरी यांनी स्पष्ट केलं आहे.