Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

  • Written By: Published:
Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

Supreme Court on Manipur Violence:  मणिपूर हिंसाचाराप्रकरणी एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अविश्वास ठरावानंतर विरोधकांकडून आज (31 जुलै) संसदेला घेराव घातला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल विधानसभेत निषेधाचा प्रस्ताव मांडणार आहे. तर दुसरीकडे मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  केंद्र सरकारने 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ज्यामध्ये केंद्राने महिलांसोबतच्या गैरवर्तनाचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले होते. (manipur violence supreme court hearing on 31 july two woman paraded without clothes viral video)

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

आज मणिपूरमध्ये महिलांसोबत असभ्य वर्तन प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या खटल्याची सुनावणी मणिपूरबाहेर हलवावी, अशी मागणी केंद्र सरकारने केली आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यापासून 6 महिन्यांत कारवाई व्हावी यासाठी खटला जलदगतीने चालवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

केंद्राने 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते

मणिपूर महिलांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने गुरुवारी (27 जुलै) प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, या प्रकरणाचा तपास राज्य सरकारच्या परवानगीने सीबीआयकडे वर्ग केला जात आहे. या खटल्याचा जलद निपटारा आवश्यक असल्याचे केंद्राने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण राज्याबाहेर हलवण्याचे आदेश द्यावेत.

‘कॉंग्रेसने कलम 370 हे 70 वर्षे आपल्या मुलासारखं सांभाळलं; अमित शाहांची टीका

ट्रायल कोर्टाला आरोपपत्र दाखल झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत निकाल देण्याचे निर्देशही द्यावेत, असे केंद्राने म्हटले आहे. तथापि, केंद्र सरकारचा दावा आहे की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, ज्यासाठी दोन्ही समुदायांशी सतत चर्चा केली जात आहे. त्याचवेळी, TMC आज पश्चिम बंगाल विधानसभेत मणिपूर हिंसाचारावर निषेधाचा प्रस्ताव सादर करणार आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube