‘कॉंग्रेसने कलम 370 हे 70 वर्षे आपल्या मुलासारखं सांभाळलं; अमित शाहांची टीका

‘कॉंग्रेसने कलम 370 हे 70 वर्षे आपल्या मुलासारखं सांभाळलं; अमित शाहांची टीका

Amit Shah On Congress : 70 वर्षे देशाच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, त्यांनी फक्त कलम 370 हे 70 वर्ष स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. आज मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या ‘विजय संकल्प संमेलना’ला संबोधित करताना शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. (Amit Shah On Congress over article 370)

अमित शाह एकदिवशीय इंदूर दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह म्हणाले की, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांना सुरुवात होणार आहे, निवडणूक प्रामुख्याने मध्य प्रदेशातील माळव्यातून होत आहे. केंद्रातील मोदीजींनी जगभर भारताचा ध्वज फडकावला आहे, आपण कोणत्याही देशात गेलो तरी भारतातील जनतेसाठी सर्वत्र मोदीजीच्या घोषणा दिल्या जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे मसिहा म्हणून संपूर्ण देशात ओळखले जातात, कारण ते गरिबांसाठी लोककल्याणकारी काम करत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मध्य प्रदेशातील भाजपचे सरकार मध्य प्रदेशला ‘डबल इंजिन सरकार’ म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे अमित शहा म्हणाले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चित्ररुपी प्रवास उद्यापासून पुण्यात 

यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 70 वर्षे देशाच्या सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, त्यांनी फक्त कलम 370 हे 70 वर्ष स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं, आणि नरेंद्र मोदी सरकारने ते रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी त्यांनी कमलनाथ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मागील कमलनाथ सरकारमध्ये अवघ्या दीड वर्षात 18 हजारांहून अधिक वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या सरकारच्या कार्यकाळात दलालांच्या मदतीने एकच उद्योग सुरू झाला, तो म्हणजे हस्तांतरण उद्योग. त्यामुळे लोकांना ‘श्रीमान बंटाधार’ यांची राजवट आठवली, असे शाह म्हणाले. तसेच, ‘श्रीमान बंटाधार’ आणि ‘करप्शन नाथ’ यांच्या सरकारच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प केवळ 23,000 कोटी रुपये होता, तर सध्याच्या शिवराज सिंह चौहान सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 3.14 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube