Video : लव्ह मॅरेजची नोंदणी करताच पालकांना जाणार नोटिफिकेशन; सरकारने बदलले नियम

Love Marriage New Rules मुलींचे संरक्षण करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी या कठोर सुधारणा करण्यात आल्या आहेत.

  • Written By: Published:
Video : लव्ह मॅरेजची नोंदणी करताच पालकांना जाणार नोटिफिकेशन; सरकारने बदलले नियम

Love Marriage New Rules : तुम्हीदेखील येत्याकाळात कुटुंबातील सदस्यांना न सांगत लव्ह मॅरेज करण्याच्या विचारात असाल तर, जरा थांबा कारण, आता प्रेम विवाह करण्यापूर्वी पालकांना सांगितले आहे याबाबतचे स्व-घोषणापत्र देणे अनिवार्य असेल. विवाह नोंदणी कायदामध्ये मोठे बदल करण्यासाठी विधानसभेत आज (दि.20) प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. नवीन प्रस्तावात नेमकं काय आहेत? त्याबद्दल जाणून घेऊया…

तुमच्या सॅलरी स्लिपवरील ‘Professional Tax’ चं सत्य माहितीये का? नसेल तर वाचाच…

कुठे ठेवण्यात आलाय प्रस्ताव

2006 च्या विवाह नोंदणी कायदामध्ये मोठे बदल करण्यासाठी विधानसभेत ठेवण्यात आलेला हा प्रस्ताव गुजरातमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात सरकारने विवाह नोंदणी कायदा नियम 44 मध्ये बदल प्रस्तावित केले आहे. करण्यात येणाऱ्या बदलांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी गुजरात सरकारने जनतेचे अभिप्राय आणि आक्षेपांसाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.

नव्या प्रस्तावित नियमांबाबत बोलताना गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, मुलींचे संरक्षण करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी या कठोर सुधारणा करण्यात आल्या आहेत. बनावट कागदपत्रांचा वापर करून किंवा पालकांच्या पूर्व परवानगीशिवाय होणाऱ्या विवाहांना यामुळे आळा बसणार आहे.

नवीन नियम काय आहेत?

व्हॉट्सअॅपद्वारे त्वरित सूचना मिळणार : एखाद्या जोडप्याने लव्ह मॅरेजच्या नोंदणीसाठी अर्ज करताच, संपूर्ण माहिती मुलीच्या पालकांना त्याच क्षणी व्हॉट्सअॅपवर पाठवली जाणार आहे.

पालकांची कागदपत्रे : जोडप्यांनी त्यांच्या पालकांना लग्नाबद्दल माहिती दिली आहे की नाही हे सांगणारे औपचारिक घोषणापत्र सादर करणे आवश्यक असेल. तसेच नोंदणी करताना केवळ वधू-वरांची कागदपत्रेच नाही तर आई-वडिलांचे आधार कार्ड आणि पालकांचा योग्य फोन नंबर देखील देणे बंधनकारक असेल.

साक्षीदारांची कडक तपासणी : लग्नाच्यावेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे फोटो आणि त्यांच्या आधार कार्डच्या प्रती सादर करणे बंधनकारक असेल.

40 दिवसांत प्रमाणपत्र दिले जाणार : अर्ज केल्यानंतर, सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जाईल आणि 40 व्या दिवशी विवाह प्रमाणपत्र दिले जाईल.

Video : भारताला चार गुजराती चालवतात, दोघे विकतात अन् दोघे; पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ

प्रशासकीय अधिकारांमध्येही बदल

आतापर्यंत विवाह नोंदणीचा ​​अधिकार फक्त तलाठ्याकडे होता, ज्यामध्ये आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येथून पुढे तलाठी फक्त अर्ज स्वीकारतील आणि कागदपत्रे तपासतील. विवाह नोंदणी मंजूर करण्याचा अंतिम अधिकार आता तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असेल.तसेच नोटरीकरण करणाऱ्या वकिलांनाही पक्षकारांच्या उपस्थितीतच स्वाक्षरी आणि शिक्का मारावा लागेल, असे न झाल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. लव्ह मॅरेजच्या नोंदणीसाठी गुजरात सरकारकडून एक समर्पित ऑनलाइन पोर्टलदेखील सुरू केले जाणार आहे.

follow us