69 th National Film Awards सोहळ्यातील क्षणचित्रांवर एक नजर टाकूयात…

69 th National Film Awards: आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 69th National Award) वितरण करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं.

देशातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांची सुरुवात 1954 साली सुरु झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या सिनेमा महोत्सव संचालनालयाकडून आयोजित करण्यात आला आहे.

24 ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आज त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये आलिया भट्ट (alia bhatt), क्रिती सेनॉन (kriti sanon) आणि अल्लू अर्जुन (allu arjan) यासारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीमध्ये आहे.
