कोकाटेंचा पत्ता कट होण्याचे संकेत, मंत्रिपदासाठी धनुभाऊंची दिल्लीत फिल्डिंग, शाहंची घेतली भेट

राष्ट्रवादीच्या मंत्र्याला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली.

  • Written By: Published:
Letsupp Image (1)

Dhananjay Munde meets BJP national president Amit Shah in Delhi : एकीकडे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात असताना राष्ट्रवादीचेच आमदार धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी दिल्लीवारी करत, थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shaha) यांची भेट घेतल्याने मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धनंजय मुंडे यांच्या दिल्लीवारीमुळे राजकीय चर्चांना उधाण

क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घोटाळ्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान या प्रकरणामुळे मंत्री कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी देखील धोक्यात आली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शकता आहे. अशातच आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं. मात्र धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट कोणत्या कारणासाठी घेतली हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

ब्रेकिंग : अजितदादांचे ‘रमी किंग’ कोकाटेंविरोधात वॉरंट जारी; अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

मंत्रिपद जाण्याअगोदर देखील आमदार मुंडेंनी केली होती दिल्ली वारी

मागे देखील धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव आल्याने धनंजय मुंडे यांचा देखील यात हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रवादीकडून त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यावेळेस देखील राजीनामा देण्याच्या अगोदर धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा दिल्लीवारी करत अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

follow us