मनोरंजन क्षेत्रात 2025 मध्ये किती सिनेमे आले; 10 ‘सुपरफ्लॉप सिनेमे कोणते?

या वर्षाला निरोप देताना, अनेक सिनेमांची चर्चा सुरू आहे. या वर्षात अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. कोणते सिनेमे अपयशी ठरले?

  • Written By: Published:
1 / 10

बॅड ऍस रवी कुमार: 'द एक्सपोज' या चित्रपटातील रवी कुमार या पात्रावर आधारित असलेला हा चित्रपट 7 फेब्रुवारीला रिलीज झाला पण फारसा चालला नाही. हिमेश रेशमियाचा कमबॅक असलेला हा ऍक्शन सिनेमा प्रेक्षकांच्या तितकासा पसंतीत पडला नाही. 20 कोटींच्या बजेटमध्ये असलेल्या या चित्रपटाने फक्त 12.70 कोटी इतकीच कमाई केली. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

2 / 10

मेरे हसबेन्ड की बीवी: 21 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 40 कोटींच्या बजेटमध्ये बनून फक्त 11. 80 कोटी इतकीच कमाई करू शकला. अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांच्या लव ट्रायअँगलवर आधारित हा चित्रपट आहे.

3 / 10

आजाद: अजय देवगण यांचा भाचा अमान देवगण आणि राशा थडानी यांचा डेब्यू असलेला हा चित्रपट 17 जानेवारीला प्रकाशित झाला. पण प्रेक्षकांच्या खास पसंतीत काही आलेला नाही. 80 कोटी बजेटमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फक्त 8 कोटी कमाई करू शकला.

4 / 10

सन ऑफ सरदार: 1 ऑगस्टला आलेला हा चित्रपट, 2012 मधील सन ऑफ सरदार चित्रपटाचा हा बहुप्रतिक्षीत सिक्वल होता. अजय देवगण, मृणाल ठाकूर याचा हा चित्रपट विनोदी आणि कौटुंबिक कथानकावर आधारित आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकलेला हा चित्रपट 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला असून फक्त 65.80 इतकीच कमाई करू शकला.

5 / 10

गेम चेंजर: एक हाय हाईप्ड- बिग बजेट फिल्म असं आपण या चित्रपटाला म्हणू शकतो.10 जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट शंकर आणि रामचरण यांच्या दमदार अभिनय आणि उत्तम VFX असून सुद्धा प्रेक्षकांच्या अपेक्षांना फोल ठरवलं. 300 कोटींचा बजेट असून 195.80 कोटी या चित्रपटाने कमावले.

6 / 10

द बंगाल फाईल्स: 5 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट 'नोआखली दंगलीवर' आधारित आहे. विवेक अग्निहोत्रींच्या 'फाईल्स' या सिरीजमधला हा तिसरा चित्रपट आहे. 30 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट फक्त 24. 40 कोटी कमावू शकला. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर असे दिग्गज अभिनेते असून सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवण्यात हा चित्रपट असमर्थ ठरला.

7 / 10

एमरजन्सी: कंगना रणौतचा डायरेक्टोरिअल डेब्यू असणारा हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या बायोपिकवर आधारित आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित झाला. यात कंगनाच्या अभिनयाचे आणि तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक तर केलेच पण हा चित्रपट फारसा गाजू शकला नाही. 50 कोटी बजेटच्या या चित्रपटाने फक्त 22.50 कोटीं इतकीच कमाई केली.

8 / 10

सिकंदर; दरवर्षीप्रमाणे ईदच्या दिवशी 30 मार्चला प्रदर्शित झालेला सलमान खानचा हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये बनूनसुद्धा फक्त 182.70 कोटी कमवू शकला. निर्दशनाबरोबर सलमान खानच्या अभिनयाने या वेळेस मात्र प्रेक्षकांना निराश केले.

9 / 10

देवा: मल्याळम इंडस्ट्रीतील गाजलेल्या 'मुंबई पोलीस' चित्रपटाचा रिमेक असलेला शाहिद कपूरचा हा चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 550 कोटींमध्ये हा चित्रपट झाला पण फक्त 58 कोटी इतकी कमाई करू शकला. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून सुद्धा प्रेक्षकांनी तितकी पसंती दिलेली दिसत नाही.

10 / 10

वॉर 2: 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि जुनिअर एनटीआर यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना उत्साही तर केले पण पटकथा आणि आर्यन मुखर्जींची स्टोरी टेलिंगमुळे चित्रपट प्रसिद्धीचे शिखर गाजवू शकला नाही. 400 कोटी गुंतवून फक्त 360 कोटीं इतकीच कमाई या चित्रपटाने केली.

follow us