उपमुख्यमंत्री सनेत्रा पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, काय होत प्रकरण?
पक्षाची स्थापना झाल्यापासून मी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवं नव्हतं.
अजित पवारांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार (Ajit Pwar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही झाल्या आहेत. यादरम्यान त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असून, हे अडथळे पार करत पुढील वाटचाल करत आहेत. यादरम्यान त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आक्षेप अर्ज आणि अंमलबजावणी संचालनालयाचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रोहित पवार यांच्यासह 70 जणांना मिळालेल्या क्लीन चीटवर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाVSR च्या विमानातून प्रवास
2007 ते 2011 या काळात बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने निकष डावलून साखर कारखान्यांनी सूतगिरण्यांना कर्ज वाटप केलं होतं. एनपीए झालेल्या साखर कारखान्यांना पुन्हा कर्ज देऊन कर्ज न फेडल्यास कवडीमोल भावान संचालकांच्या नातेवाईकांनी कारखाने मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयने कोर्टात कठोर भूमिका घेत हस्तक्षेप अर्ज टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र मुंबई हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावल्याने आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणावर पडदा पडला आहे.
राज्य सहकारी बँकेने 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केलं होतं. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि काही कंपन्यांना हे कर्जवाटप करण्यात आलं होतं. ही सर्व कर्ज बुडीत निघाली होती. सुरिंदर अरोरा यांनी 2010 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा घोटाळा 25 हजार कोटींचा असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी
पक्षाची स्थापना झाल्यापासून मी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवं नव्हतं. दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्षं मी संसार केला आहे. त्यामुळे ही जबाबदारी कठीण असली तरी तुमच्या पाठबळामुळे आणि साथीने अशक्य नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आहे अशी भावना सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर बोलून दाखवली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांनी आपला निर्धार व्यक्त करताना अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्या भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या जाण्याने अपार दु:खातून आपण अजूनही सावरलेले नाही. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झालेली आहे.
ही पोकळी भरून येणं शक्य नाही. आपल्या सर्वांच्या मनात एकच नाव आहे अजितदादा. शेतकरी, विकासासाठी, युवक, महिलांसाठी, पक्षासाठी ते झटत राहिलेले तुम्ही पाहिले आहे. सर्व स्वप्न त्यांना अर्ध्यावरून सोडून जावं लागलं. त्यांची स्वप्न अपूर्ण राहणार नाही. आपण सर्व एकत्र येऊन ती वेगळ्या उंचीवर नेऊ,” असं त्या म्हणाल्या.
