भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांचा सूर बदलला, काँग्रेस सोडण्याची मोठी कारणं सांगितली

Pradnya Satav यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं सांगितली

Pradnya Satav

Pradnya Satav tone changed as soon as joined BJP gave three big reasons for leaving Congress : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राज्यातील राजकाणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी त्यांनी कॉंग्रेस विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर हा पक्षप्रवेश पार पडला.

राम सुतार यांच्या निधनान शिल्पकलेचा साधक देशाने गमावला- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजप प्रवेश पार पडला. यावेळी सातव यांनी लगेचच आपला सूर बदलल्याचं पाहायला मिळालं. त्यात त्यांनी काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं सांगितली. ही कारण कोणती आहेत? वाचा सविस्तर

काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं

यावेळी प्रज्ञा सातव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश आणि कॉंग्रेस सोडण्यावर म्हटलं की, माझे पती राजीव सातव यांचं अपूर्ण राहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यभरातील विकासामध्ये हातभार लावण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज भाजपमध्ये सामील होत आहे.

देवेंद्र फडणवीस टप्या-टप्प्यांने गेम करणार अन्…, खासदार राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

कारण माझे पती राजीव सातव यांची हिंगोली ही जन्मभूमि होती. त्यांनी आणि आमच्याम मातोश्री रजनी सातव यांनी देखील हिंगोलीमध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातूनच मी देखील गेल्या 20 वर्षांपासून विविध काम केली आहेत. त्यानंतर आता आम्हाला भाजपसोबत त्यांच्या विकास कामामध्ये साथ द्यायची आहे.

follow us