सातारा सैनिक शाळेत विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 38,000 रुपये पगार
Sainik School Satara Bharti 2024 : आज अनेकजण नोकरीच्या (Nokarti) शोधात आहे. मात्र, सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे या स्पर्धेच्या युगात फारच कठीण झालं. दरम्यान, तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, सैनिक स्कूल सातारा (Sainik School Satara ) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती ? अर्ज करण्यासाठी शुल्क किती? याच विषयी जाणून घेऊ.
घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट
सैनिक स्कूल सातारा ही भारतातील प्रतिष्ठित सैनिक शाळा आहे. सैनिक स्कूल सातारा येथे सध्या विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या सैनिक स्कूल अंतर्गत पाच रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत TGT आणि वॉर्ड बॉय पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदाचे नाव –
सैनिक स्कूल सातारा अंतर्गत टीजीटी आणि वॉर्ड बॉय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
पदांची संख्या –
TGT – 03
वॉर्ड बॉय – 02
Kate Sharma : केट शर्माचा बोल्ड अदा, फोटो पाहून चाहत्यांचा हार्ट ब्रेक
शैक्षणिक पात्रता –
1. TGT (गणित) -B.Sc., B.Ed., इंटिग्रेटेड कोर्स, CTET / STET.
2. TGT (सामाजिक शास्त्र) – पदवीधर, /डिप्लोमा इन एज्युकेशन, CTET/STET, B.A.Ed.
3. TGT (Genral science) – B.Sc., B.Ed., Bachelor’s Degree, Integrated course, CTET / STET.
4. वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन – वॉर्ड बॉय पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
नोकरीचे ठिकाण –
नोकरीचे ठिकाण सातारा आहे.
वयोमर्यादा –
पात्र उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज पद्धत –
या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज करावा.
मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा. PO Box No.20, सदर बाजार, जिल्हा- सातारा (महाराष्ट्र) – 415001
पगार –
TGT – रु. 38,000/महिना
वॉर्ड बॉय – रु. 25,000/महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाइट – http://www.sainiksatra.org
अधिसूचना https://www.sainiksatara.org/images/School_web_site_Advt__03_Apr_24.pdf
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज कराावा. चुकीचे माहिती असलेले आणि दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.