नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! BEL मध्ये विविध पदांची भरती सुरू, वाचा कोणाला करता येणार अर्ज?

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! BEL मध्ये विविध पदांची भरती सुरू, वाचा कोणाला करता येणार अर्ज?

अनेक जण हे नोकरीच्या (Jovb शोधात आहे. मात्र, स्पर्धा इतकी वाढली की, नोकरी मिळणं अवघड झालं आहे. मात्र, आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.  Bharat Electronics Limited (BEL) पुणे यांनी अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी अधिकारी-I पदांच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पद भरतीसाठी पदांनुसार  पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज बोलावले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटीफिकेशमध्ये देण्यात आली आहे. (Recruitment for various posts in Bharat Electronics can be applied till 25th August)

अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जासोबत जोडावा. अर्ज करायला सुरूवात झाली असू्न  25 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पदांची संख्या-11

पदाचे नाव – अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी अधिकारी-I

शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी सहाय्यक – मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयातील किमान 3 वर्षे कालावधीचा अभियांत्रिकी पदविका.
तंत्रज्ञ – SSLC+ITI+ एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी.
प्रशिक्षणार्थी अधिकारी – १- या पदांसाठी मान्यताप्राप्त युनिवर्सीटी/ संस्थेमधून MBA फायनान्स/  सीए/ सीएमए पात्रता परिक्षेतील गुणांचा किमान टक्केवारी आवश्यक आहे

नोकरी ठिकाण – पुणे.

वयोमर्यादा – 28 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

‘माझ्या घराचा इश्यू केला, तुमच्या दोन एकरातल्या घराचं काय?’ शिंदेंनी रोहित पवारांकडे हिशोबच मागितला
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.

अधिकृत वेबसाइट – bel-india.in

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1LTUDWzdxgxzSNPp9XbPVpCydAoAVBUW8/view

असा अर्ज करा-
उमेदवारांना संबंधित पदासाठी अर्ज हा ऑनलाइन करावा लागेल.
उमेदवारांना https://jobapply.in/bel2023pune/ लिंकद्वारे अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करतांना चुका झाल्या तर अर्ज रद्द होईल.
फी भरण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube