शरद पवार गटाची तक्रार अन् भाजपनं शिंदे-अजितदादांचं नाव हटवलं; नेमका प्रकार काय?
Lok Sabha Elections : राज्यात महायुतीने अनेक मतदरसंघात उमेदवार दिले (Lok Sabha Elections) आहेत. या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचा प्रचार करण्यासाठी आता स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरणार आहे. राजकीय पक्षांनी या स्टार प्रचारकांची यादी तयार करून निवडणूक आयोगाला (Election Commission) धाडली आहे. मात्र या प्रचारकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा (Ajit Pawar) समावेश होता. मात्र सुधारित यादी आली आहे. या यादीत शिंदे आणि अजित पवार यांची नावं नाहीत.
या नेत्यांची नावं का वगळण्यात आली याची चर्चा सुरू झालेली असतानाच उत्तरही मिळालं आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली होती. भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे या तक्रारीत नमूद केले होते. निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर स्टार प्रचारकांच्या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावं वगळण्यात आली.
Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी
राज्यात पाच टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी काही दिवसांपू्र्वी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. या यादीवर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. भाजपने लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 77 आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर सुधारित यादी जाहीर करण्यात आली.
यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवीन यादी पाठवली आहे. ही यादी राज्यातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी वैध मानली जाऊ शकते, असे अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
Lok Sabha Election दरम्यान युती-आघाडींचे आरोप-प्रत्यारोप; भाजपच्या जाहिरातींवरून थोरातांचा हल्लाबोल
निवडणूक आयुक्तांनीही पाठवलं पत्र
दरम्यान, लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहिजेत असा नियम आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्याच पक्षातील नेत्यांचा समावेश असला पाहिजे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.