Ajit Pawar भोळा माणूस त्या स्वभावामुळेच ते फसले; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा टोला

Ajit Pawar भोळा माणूस त्या स्वभावामुळेच ते फसले; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा टोला

Ajit Pawar : सध्या आगामी लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे याच दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक धक्कादायक विधान केलं. त्यावरून त्यांना विरोधकांकडून घेरले जात आहे. त्यांच्या याच फक्त व्यवहार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra aawhad ) यांनी अजित पवारांना टोला लगावत म्हटलं की अजित पवार हा भोळा माणूस आहे त्यांच्या या स्वभावामुळे ते फसले.

काय म्हणाले होते अजित पवार?

बारामतीच्या सभेमध्ये बोलत असताना अजित पवार म्हणाले की विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाई अंतर्गत आपण वाचवल आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार हा भोळा माणूस आहे. म्हणूनच ते बोलून गेले की, मोक्कातील आरोपीला मी सोडवलं. पण मोक्कातील आरोपी सुटू शकतो. हे माझ्यासाठी आश्चर्य आहे. म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे.

शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा

मोक्का दाखल करताना मोठी फाईल तयार होते. त्याला खूप मान्यता घ्यावे लागतात. पण अजित पवार म्हटले की, मी अशा कार्यकर्त्याला वाचवलं त्यामुळे सध्या राजकारणाचा गुन्हेगारीकरण झालं आहे. तसेच ते भोळे आहेत. म्हणूनच एवढे पटकन बोलून गेले. त्यांची ही कबुली म्हणजे त्यांच्या स्वभावाचे दर्शन आहे. त्यांच्या याच स्वभावामुळे ते पटकन फसले आहेत. त्यांना बोलायचं असतं. एक मात्र ते वेगळच बोलून जातात. तसेच त्यांना शरद पवार कधी मरणार? हे असे देखील म्हणायचं नव्हतं. मात्र ते बोलून गेले त्याचा अर्थही तोच निघतो. असा टोला अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आव्हाड यांनी लगावला आहे.

Do Aur Do Pyaar: सिनेमाची स्क्रिप्ट हातात येताच प्रतीक गांधींचा होकार; म्हणाले…

तर सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राज्यसरकारला घेरलं आहे. त्या म्हणाल्या की, एवढ्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना सोडवलं जात असेल तर राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं. अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube